शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

लिलाव नसतानाही जागोजागी रेती साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST

रेतीची वाहतूक करीत असताना कारवाई झाल्यास संगनमत केले जाते. ती रेती नसून धानाचा कोंढा होता, असा भासही निर्माण केला जातो. रेतीवर कोंढा टाकून प्रकरण दाबले जात असल्याचीही बाब समोर येत आहे. दुसरीकडे गत तीन महिन्यात विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर किंवा टिप्परने रेतीची वाहतूक होत असल्याचे प्रकार घडले आहे. घटनास्थळाहून रेती पाडून पळून जाण्याचा प्रकारही नेहमी घडतो.

ठळक मुद्देकारवाईचीही उरली नाही धास्ती : अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वाढले हल्ले, तस्करीसाठी लढविताहेत नवनवीन शक्कल

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उच्च दर्जाची व गुणवत्ता असलेली रेती वैनगंगा नदीच्या पात्रातून जिल्ह्याला लाभलेली नैसर्गीक देणगी आहे. मात्र या देणगीची रेतीतस्कर प्रचंड लूट करीत आहे. रेतीघाटांचे लिलाव झाले नसतानाही ठिकठिकाणी रेतीचे साठे दिसून येत आहे. एकंदरीत रेती तस्करांची गुंडागर्दी वाढली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.ऑगस्ट २०१८ मध्ये मोहाडी येथे पोलीस पथकावर रेती तस्करांनी जीवघेणा हल्ला केला होता. यात एका पोलिस उपनिरीक्षकाला गंभीर दुखापत झाली होती. अन्य कर्मचारीही चांगलेच जखमी झाले होते.पवनी, लाखांदूर तालुक्यातही रेतीतस्करांनी महसूलसह पोलिसांनाही लक्ष्य करीत हल्ले केले. जीवानिशी ठार मारण्यापर्यंत मजल या रेतीतस्करांची पोहचली आहे. पवनी तालुक्यात तर ठिकठिकाणी रेतीची डम्पिंग पहायला मिळत आहे. यातून मोहाडी व तुमसर तालुकाही सुटलेला नाही.लाखांदूर तालुक्यातही रेतीची वारेमाप लुट सुरू आहे. महसूल प्रशासनाच्या डोळ्यासमोर नैसर्गीक संपत्तीची लुट होत असताना जीवाच्या आकांतापोटी कुणीही धाडस करण्याचे सामर्थ दाखवित नाही.दुसरीकडे महसूलसह काही पोलीस विभागाशी साटेलोटे करून या गौण खनिजाची लुट करीत असल्याचीही बाब समोर येत आहे. विशेष म्हणजे आता तर रेती माफियांनी विविध शक्कल लढवून रेतीची चोरी सुरू केली आहे.रेती नव्हे तो तर धानाचा कोंढारेतीची वाहतूक करीत असताना कारवाई झाल्यास संगनमत केले जाते. ती रेती नसून धानाचा कोंढा होता, असा भासही निर्माण केला जातो. रेतीवर कोंढा टाकून प्रकरण दाबले जात असल्याचीही बाब समोर येत आहे. दुसरीकडे गत तीन महिन्यात विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर किंवा टिप्परने रेतीची वाहतूक होत असल्याचे प्रकार घडले आहे. घटनास्थळाहून रेती पाडून पळून जाण्याचा प्रकारही नेहमी घडतो. प्रशासक फक्त पकडलेली रेती जप्त करून सुटकेचा नि:श्वास सोडते.कोट्यवधींचा महसूल पाण्यातजिल्ह्यात दशकभरापुर्वी ९० पेक्षा जास्त रेतीघाट होते. काही रेतीघाटांचे प्रकरण न्यायालयीन प्रकरणात आहे. तर गोसेखुर्द धरणाचे पाणी अडविल्यामुळे काही रेतीघाट पाण्याखाली आले आहेत. दरम्यान जे रेतीघाटांचे लिलाव केले जातात त्यापैकी त्यांची प्रक्रियाही पूर्ण व्हायची आहे. असे असले तरी रेतीघाटातून रेतीचा उपसा सुरूच आहे. परिणामी कोट्यवधींचा महसूल बुडत असताना जिल्हा खनिकर्म विभागही गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे वाळूमाफियांना रान मोकाट करून दिले काय, अशी चर्चा आहे.ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच अधांतरीरेतीघाटातून रेतीची वारेमाप लुट होत असताना त्यावर निगरानी ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा २४ तास ठेवणे अशक्य बाब आहे. अशावेळी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेवून महत्वाच्या रेतीघाटांवर नजर ठेवण्यात येणार होती. याची रितसर घोषणाही तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र घोषणा हवेतच राहिली. ड्रोन कॅमेऱ्याचा विषय अधांतरी आहे.

टॅग्स :sandवाळू