शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

रेती महाराष्ट्राची, राॅयल्टी मध्यप्रदेशची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

महाराष्ट्रातील तुमसर तालुक्यातील केवळ उमरवाडा घाटाचा लिलाव झाला आणि ताेही सीमेवर नाही. तर मध्य प्रदेशातील बहुतांश सर्वच घाटांचे लिलाव झाले आहेत. त्यामुळे पैल तिरावरून रेतीचे उत्खनन सुरू आहे. जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात अहाेरात्र उत्खनन केले जाते. मात्र, उत्खनन करताना मध्य प्रदेशातील कंत्राटदार महाराष्ट्राच्या सीमेतील रेतीचे उत्खनन करतात. असाच प्रकार वैनगंगा नदीपात्रातही सुरू असताे.

ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरून वाहणाऱ्या बावनथडी आणि वैनगंगा नदी रेती तस्करांसाठी परवणी ठरली आहे. कुठलेही सीमांकन नसल्याने महाराष्ट्राच्या हद्दीतील रेती उत्खननाचा सपाटा मध्य प्रदेशातील ठेकेदारांनी लावला आहे. रेती महाराष्ट्राची आणि राॅयल्टी मध्य प्रदेशाची असा प्रकार गत काही वर्षांपासून सुरू आहे. यात भंडारा जिल्ह्याच्या महसुलाला माेठा चुना लागत आहे. यात सर्वच जण डाेळ्यावर पट्टी बांधून आहेत.महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरून बावनथडी नदी वाहते. या नदीवर नाकाडाेंगरी, आष्टी, पाथरी, चिखली, देवनारा, बपेरा असे रेती घाट आहेत. तर मध्य प्रदेशाच्या सीमेत भाेरगड, अंजनविरी, बाह्मणी आदी घाट आहेत. महाराष्ट्रातील तुमसर तालुक्यातील केवळ उमरवाडा घाटाचा लिलाव झाला आणि ताेही सीमेवर नाही. तर मध्य प्रदेशातील बहुतांश सर्वच घाटांचे लिलाव झाले आहेत. त्यामुळे पैल तिरावरून रेतीचे उत्खनन सुरू आहे. जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात अहाेरात्र उत्खनन केले जाते. मात्र, उत्खनन करताना मध्य प्रदेशातील कंत्राटदार महाराष्ट्राच्या सीमेतील रेतीचे उत्खनन करतात. असाच प्रकार वैनगंगा नदीपात्रातही सुरू असताे.सीमेवरून वाहणाऱ्या नदीत कुठेही सीमांकन झाले नाही. त्यामुळे काेणता भाग महाराष्ट्राचा आणि काेणता मध्य प्रदेशाचा हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे येथे रेती कंत्राटदारांसाठी चांगलीच पर्वणी असते. मध्यप्रदेशाच्या सीमेतून रेतीचे उत्खनन केले जाते. त्यासाठी मध्य प्रदेशच्या राॅयल्टीचा वापरही हाेताे. त्यामुळे त्यांच्यावर काेणती कारवाई करणे शक्य नाही. मात्र, रेती महाराष्ट्राची असल्याने भंडारा जिल्ह्याचा महसूल मात्र बुडत आहे.

दरराेज ५०० ट्रकमधून वाहतूकमध्य प्रदेशातील कंत्राटदार बावनथडी आणि वैनगंगा नदीपात्रातून दरराेज ५००च्या वर रेतीची वाहतूक करीत आहेत. सहा ते सात घाटांवर त्यांचा बाेलबाला आहे. जेसीबी मशीनने उत्खनन करून ट्रक, टिप्परने त्याची वाहतूक केली जात आहे. राॅयल्टी असल्याने त्यांच्यावर कारवाई करणेही शक्य नाही.

रेती कंत्राटदारांचा तुमसरमध्ये ठिय्या-    मध्य प्रदेशातील वाराशिवणी, बालाघाट आणि कटंगी येथील कंत्राटदारांनी मध्य प्रदेश सीमेतील रेतीघाट लिलावात घेतले आहेत. मात्र, त्यांची सर्व नजर महाराष्ट्रातील रेतीवर असते. त्यामुळेच कंत्राटदार व त्यांची माणसे तुमसर तहसीलच्या परिसरात ठिय्या देऊन असतात. कारवाई हाेऊ नये यासाठी ते दक्ष असतात. अर्थकारणामुळे महसूल विभाग काेणतीही कारवाई करीत नाही. हा प्रकार गत कित्येक वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्रातील घाटांचे लिलाव झाले असते तर कंत्राटदारांनीच आपल्या पद्धतीने याेग्य ताे बंदाेबस्त केला असता; परंतु आता तेही शक्य नाही. त्यासाठी आता महसूल विभागानेच पुढाकार घेवून सीमांकन निश्चित करावे.

 

टॅग्स :riverनदीsandवाळू