शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला उपसा प्रकल्पाच्या ‘सम’मध्ये रेतीचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात नदीच्या पात्रातील पाण्याचा उपसा करण्यासाठी सम (टाकी) ची निर्मिती करण्यात आली आहे. नदीपात्रातील पाणी सममध्ये जमा करण्यात येत आहे. या सममध्ये नदीपात्रातील लाकडी ओंडके येणार नाही, यासाठी जाळी लावण्यात आली आहे; परंतु जाळीची नासधूस झाली असल्याने पुराचे पाण्यात वाहून येणारे लाकडी ओंडके, केरकचरा थेट सममध्ये शिरत असल्याने पंपाचे अडचणी वाढवीत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या सममधील पावसाळ्याचे पूर्वी रेती, माती, लाकडी ओंडके व अन्य केरकचऱ्याचा उपसा करण्यात आलेला नाही. यामुळे पावसाळ्यात नदीच्या पात्रातून पाण्याचा उपसा अडचणीत येणार आहे. पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपात तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाने वातानुकूलित खोलीत बसून निर्णय घेत असल्याने प्रकल्पाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात नदीच्या पात्रातील पाण्याचा उपसा करण्यासाठी सम (टाकी) ची निर्मिती करण्यात आली आहे. नदीपात्रातील पाणी सममध्ये जमा करण्यात येत आहे. या सममध्ये नदीपात्रातील लाकडी ओंडके येणार नाही, यासाठी जाळी लावण्यात आली आहे; परंतु जाळीची नासधूस झाली असल्याने पुराचे पाण्यात वाहून येणारे लाकडी ओंडके, केरकचरा थेट सममध्ये शिरत असल्याने पंपाचे अडचणी वाढवीत आहेत. टाकीत गत अनेक वर्षांपासून रेती, माती आणि लाकडी ओंडके, केरकचरा जमा झालेला आहे. रेतीचे ढीग तयार झाले असल्याने नदीच्या पात्रातील पाणी टाकीत जमा होत नाही. टाकीच्या दिशेने असणाऱ्या नदीपात्रातील पाण्याचे प्रवाहात बदल झालेला आहे. यामुळे पाण्याचे प्रवाहात गती दिसून येत नाही. अखेरच्या क्षणात पाण्याचा उपसा बंद करण्यात येत आहे. प्रकल्प वर्षभरातून फक्त तीन महिने पाण्याचा उपसा करीत आहे. यामुळे टाकीतील रेतीचा उपसा करण्याची मागणी आहे. वातानुकूलित खोलीत बसून नियोजन तयार करण्यात येत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातील समस्या व अडचणी निकाली काढण्यासाठी जून महिन्याचा कालावधी शिल्लक आहे; परंतु नियोजनाचा थांगपत्ता नाही. अधिकाऱ्यानी अद्यापपर्यंत प्रकल्पस्थळात आढावा घेतला नाही. पंपगृहात समस्या आहेत. 

प्रकल्प वाऱ्यावर सोडले - प्रकल्प अडचणीत पाण्याचा उपसा करीत आहे. डागडुजीत डोलारा सुरू आहे. नियंत्रण सुटल्याने प्रकल्प स्थळात वांधे वाढले आहेत. पंपांची देखभाल व दुरुस्ती करण्यात विलंब करण्यात येत आहे. टाकीतील गाळ उपसा करण्यात आला नाही. नदीपात्रातील झुडपे, माती व रेतीचे ढिगारे काढण्यात आले नाहीत. टाकीच्या समोरील गाळ उपसा करण्यात आला नाही. यामुळे प्रकल्प वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा अनुभव येतो आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प