सही शिक्केही आणले उपयोगात : फेरफार न झाल्याने प्रकार उजेडाततुमसर : अकृषक जमिनीचे बनावटी एन. ए. (अकृषक) कागदपत्र तयार करणारे रॅकेट तुमसरात सक्रीय झाले आहे. भुखंड खरेदी विक्रीच्या प्रकरणात जमिनीचे बनावट अकृषक कागदपत्र जोडून रजिस्ट्री करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला. तुमसर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. परंतु पोलिसांनी अजूनपर्यंत कोणतीच कारवाई न केल्याने दोषी अजूनही मोकाटच आहेत.तुमसर शहरात ले-आऊटचा व्यवसाय जोमात थाटण्यात आला आहे. एन.ए.टी.पी. झालेले भुखंड विकणे आहे, असे फलक लावून ग्राहकांची मने आकर्षीत करण्याकरिता प्रलोभनही देण्यात येत आहे. ले-आऊट धारक हा कमी वेळात जास्त पैसे कमविण्याच्या नादात ले-आऊटची जमीन अकृषक नसतानाही बनावट अकृषक (एन.ए) तयार करुन ग्राहकांना ती दाखविली जाते. त्याच खोटया एन.ए.च्या आधारावर ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेवून जमिनीचा सौदा केला जातो. यात ग्राहकांची फसवणुक करीत असल्याचा प्रकार सध्या तुमसर शहरात सुरु आहे. तालुक्यातील तामसवाडी साझा क्र. २९ भुमापन क्र. २३७, खाते क्र. १४० या जमिनीतील ०.४० हे.आर. ही जमीन महादेव देवाजी वैद्य रा. तुमसर यांच्याकडून ले-आउट धारक रमेश भैय्यालाल बघेले रा. शिवाजीनगर तुमसर सुरजकुमार मारोती सातपैसे रा. चिचोली रविंद्र मारोती पटले रा. शिवनगर तुमसर या तिघांनी मिळून घेतली. त्यावेळी त्या जमिनीचे एन.ए. नव्हते. दरम्यान या तिघांनी ले-आऊट धारकांनी वैद्य यांच्या नावाने बनावटी खोटा उपविभागीय अधिकारी भंडारा यांच्याकडून कडून गुंठेवारी एनएची प्रत तयार केली. हुबेहुब एन.ए. कॉपी बनवून अधिकाऱ्यांचे खोटे सिल शिक्केही वापरण्यात आले व खोटी सही देखील करण्यात आली आहे. त्या बनावटी एनएच्या आधारे लेआउट धारकांनी ग्राहकांच्या रजिस्ट्री उरकवून घेतली. ग्राहक तलाठी कार्यालयात गेले तेव्हा जमिन अकृषक नसल्याचे सांगून तलाठ्याने फेरफार घेण्यास नकार दिला तेव्हा हे बिंग फुटले. (शहर प्रतिनिधी)
बनावट दस्ताऐवजांच्या आधारे अकृषक जमिनीची विक्री
By admin | Updated: July 19, 2016 00:32 IST