शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी गोधन विक्रीला!

By admin | Updated: January 28, 2015 23:10 IST

वर्षभर शेतात राबराब राबायचे, शेतीसाठी बँक, बचत गट, सहकारी संस्था, सोसायटी आणि वेळप्रसंगी सावकाराकडून कर्ज घ्यायचे. त्यातून शेती पिकवायची. हाती येणाऱ्या उत्पन्नातून कुटूंबाचा

रवीन्द्र चन्नेकर - बारव्हावर्षभर शेतात राबराब राबायचे, शेतीसाठी बँक, बचत गट, सहकारी संस्था, सोसायटी आणि वेळप्रसंगी सावकाराकडून कर्ज घ्यायचे. त्यातून शेती पिकवायची. हाती येणाऱ्या उत्पन्नातून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवायचा, असा जीवनाचा गाडा हाकणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मात्र निसर्गाने चांगलाच फटका दिला. दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक बोझा वाढत आहे. त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांनी आता कवडीमोल भावात गोधन विक्रीला काढले आहे.पशुपालकाचा सखासोबती असलेल्या ठवळ्या-पवळ्याची जोडी असो व अन्य पशुधनाची विक्री तई, सानगडी बैल बाजारात केली जात आहे. बारव्हा परिसरातील ३५ ते ४० गावातील काही शेतकरी आपले पशुधन कसायाच्या हवाली करीत आहेत. धान, ऊस उत्पादक म्हणून लाखांदूर तालुक्याची ओळख आहे. या परिसरात यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना पुरते हतबल केले. मागील काही वर्षापासून निसर्गाच्या वृष्ट्रचक्रात शेतकरी व पशुपालक अडकला आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली तो पुरता दबल्या गेला आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगाम पावसाअभावी हातून गेला. निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाता यावे म्हणून बँक, सावकार, बचत गट व हात उसणवारीच्या, कर्जाच्या परतफेडीसाठी खरीप हंगामानंतर शेतकरी व पशुपालकांनी आपले पशुधन विक्रीला काढले आहे. पशुधन विकले नाही तर आपल्यावर कर्जाचा डोंगर वाढत जाईल. या भीती शेतकऱ्यांना आहे. पुढील रब्बी हंगामाचीही आशा मावळली आहे. त्यामुळे चाऱ्याचीही भीषण टंचाई होणार, या भीतीपोटी पशुपालक, शेतकऱ्यांनी पशुधन विक्रीचा निर्णय घेतला आहे.लाखांदूर तालुक्यातील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. आधुनिक संयंत्रामुळे सर्वत्र ट्रॅक्टरने नांगरणी व मळणी यासोबत शेतीची अनेक कामे ट्रॅक्टरने केली जाते. त्यामुळे बैलांनाही आता कामे उरली नाहीत. अशाही स्थितीत शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकटासोबत आधुनिक यंत्रांनी संकट निर्माण केले आहे. शेतीकामात मोठ्या प्रमाणावर आधुनिक संयंत्राचा वापर होत असल्याने पशुधन निकामी ठरत आहे.