शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साकोली-पवनीत अविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:10 IST

येथील नगर परिषद सभापतीपदाची बुधवारला अविरोध निवड करण्यात आली. यात महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी राजश्री मुंगुलमारे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी जगन उईके तर स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी मीना लांजेवार यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देविषय समितीची निवडणूक : साकोलीत सभापतींना बसण्यासाठी कक्षच नाही

आॅनलाईन लोकमतसाकोली : येथील नगर परिषद सभापतीपदाची बुधवारला अविरोध निवड करण्यात आली. यात महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी राजश्री मुंगुलमारे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी जगन उईके तर स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी मीना लांजेवार यांची निवड करण्यात आली. नगरपरिषदेत सभापतीसाठी स्वतंत्र कक्ष नसल्याने सभापतीमध्ये नाराजीचा सूर आहे.साकोली नगरपरिषदेत आज नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. या तिन्ही समितीच्या सभापतीची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अध्याशी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरूण मल्लाणी, गटनेता अनिता पोगडे, शहर अध्यक्ष किशोर पोगडे उपस्थित होते.पवनी : येथील नगर परिषदेच्या विषय समितीची निवडणूक उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगराध्यक्ष पूनम काटेखाये यांची पदसिद्ध सभापती म्हणून स्थायी समितीवर निवड करण्यात आली. बांधकाम समितीच्या सभापतीपदी विजय बावनकर यांची शिक्षण समिती सभापतीपदावर प्रियंका जुमळे, पाणी पुरवठा व जल निस्सारण समिती सभापतीपदावर विजय उरकुडकर, महिला व बाल कल्याण सभापतीपदी रोशनी बावनकर तर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपद उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर यांचेकडे सोपविण्यात आले. विलास काटेखाये यांच्या नेतृत्वात नगरविकास आघाडीने ही निवडणूक जिंकली होती. नगराध्यक्ष पद आघाडीकडे तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे कमलाकर रायपुरकर यांची वर्णी लागली होती. यावेळी मुख्याधिकारी माधुरी मडावी, नगराध्यक्ष पूनम काटेखाये, उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर सर्व नगरसेवक उपस्थित होते.