शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

साकोली, लाखनी, तुमसरात एस.टी.चा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:05 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन साकोली, लाखनी, तुमसर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सेवेसाठी : बसस्थानकातील प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन साकोली, लाखनी, तुमसर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.साकोली : जनतेच्या सेवेत अविरत राहून प्रवाशांना उच्चतम प्रवाशाच्या सोयी उपलब्ध करून एस.टी. ने आजही आपले स्थान कायम ठेवले आहे. यासाठी महामंडळातर्फे प्रवाशासाठी वेगवेगळ्या योजना काढण्यात येऊन याचा फायदा थेट प्रवाशांना देण्यात येतो. त्यामुळे एस.टी. सेवा एक उत्तम सेवा असून कोट्यवधी प्रवाशी आज समाधानी आहेत, असे मत आगार व्यवस्थापक सचिन नेवारे यांनी साकोली बसस्थानकात एस.टी. च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. यावेळी बसस्थानकातील प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच आजपासून शिवशाही बसमध्ये जेष्ठ नागरिकांना ४५ टक्के तर स्लीपर कोच बसमध्ये ३० टक्के सवलत लागू करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. चंद्रकांत वळसकर, वाहतूक निरीक्षक विजय नंदागवळी, निरीक्षक सुभाष हटवार, पृथ्वीराज चव्हाण, वाहतूक नियंत्रक अशोक देशमुख, लिपीक नरेश नगररक तर प्रवाशी रूपाली साठवणे, समृद्धी साळवे, संस्कार साठवणे, अनिल चांदेवार, शिक्षक चांदेवार, समीर चांदेवार उपस्थित होते.लाखनी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस.टी. चा वर्धापन दिन येथील मुख्य बसस्थानकात साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा ज्योती निखाडे यांचे अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, प्रा. अशोक गायधनी, गोपालकृष्ण गिºहेपुंजे, वाहतूक निरीक्षक भास्कर डहाके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक सोलसे यांनी सुरक्षिततेसाठी एस.टी.नेच प्रवास करावा. खाजगी वाहनांनी प्रवास करू नये. एस.टी. द्वारा प्रवाशांसाठी असलेल्या विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थितांना केले. प्रा. अशोक गायधनी, ज्योती निखाडे यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमोद फाये, अशोक वैद्य, तरोणे, चोले, राजू निखाडे, इटवले आदीसह प्रवासी उपस्थित होते. संचालन दिलीप भैसारे यांनी केले. अशोक वैद्य यांनी आभार मानले.तुमसर : धावपळीच्या जिवनात प्रवास सुखाचा व्हावा, सुरक्षित व्हावा याकरिता प्रवासी एस.टी. बसलाच प्राधान्य देतात. कमी पैशात हमखास सेवा म्हणून सामान्य जनतेची प्रथम पसंत ठरली आहे. बसचा प्रवास सुरक्षित प्रवास ठरला असल्याचे प्रतिपादन राहुल डोंगरे यांनी केले.रापम तुमसर आगाराच्या वर्धापन दिन आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आगार प्रमुख युधिष्ठीर रामचवरे होते. प्रमुख अतिथी व पालक अधिकारी म्हणून शैलेश भारती, विभागीय अधिकारी, रचना मस्करे, एस.एल. लांजेवार, विरेंद्र गभने उपस्थित होते. यावेळी बसस्थानकावर सडा घालून, रांगोळी काढण्यात आली. फुलांचे तोरण, आंब्याचे पान व केळीचे खांब स्वागतस्थानी उभारण्यात आले. प्रवाशांना पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. संचालन विरेंद्र गभणे यांनी तर आभार ज्ञानेश्वर घाटोळे यांनी मानले.