शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
8
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
9
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
10
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
11
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
12
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
13
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
14
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
15
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
17
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
19
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
20
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास

पोलीस पाटलानेच केली रेतीची चोरी

By admin | Updated: December 10, 2015 00:45 IST

गावातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालून गावात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी ज्या पोलीस पाटलाची त्यानेच रेतीची चोरटी वाहतूक करून ....

विरली (बु.) : गावातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालून गावात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी ज्या पोलीस पाटलाची त्यानेच रेतीची चोरटी वाहतूक करून आपल्या पदाला काळीमा फासल्याचा प्रकार जवळच्या उमरी (चौ.) येथे उघडकीस आला. याप्रकरणी ट्रॅक्टर जप्त केला आहे.उमरी (चौ.) येथील नदीपात्रातून रात्रीच्या वेळी रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची गावकऱ्यांना कुणकुण लागली होती. त्यामुळे येथील सरपंच प्रमोद खरकाटे, उपसरपंच राहुल सोनटक्के आणि काही जागरूक गावकऱ्यांनी रात्री पाळत ठेवून रेतीचोरांना पकडण्याचा चंग बांधला. दि. ८ डिसेंबरला रात्री ११ च्या सुमारास नदीपात्रातून रेती भरलेला ट्रॅक्टर येत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. गावकऱ्यांनी तातडीने बैलगाडी आडवी टाकून ट्रॅक्टर अडवला. तेव्हा तो ट्रॅक्टर खुद्द गावचे पोलीस पाटील प्रफुल्ल प्रभाकर सावरबांधे यांच्या मालकीचा असल्याचे आणि स्वत: पोलीस पाटीलच ट्रॅक्टर चालवित असल्याचे आढळले. समोर आरोपी म्हणून पोलीस पाटील दिसताच गावकरी क्षणभर भांबावले. मात्र लगेच या धक्क्यातून सावरत आरोपी पोलीस पाटलांना रेती भरलेला ट्रॅक्टर ग्रामपंचायतमध्ये उभा करण्याची विनंती केली. मात्र पोलीस पाटील सावरबांधे यांनी गावकऱ्यांची मागणी धुडकावून ट्रॅक्टर सरळ आपल्या घरी उभा करून त्यातील रेती उपसली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी घटनेची माहिती पवनी पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. घटनेचा पंचनामा करून आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर जप्त केला. त्याचप्रमाणे आरोपीला अटक करून जामीनावर सोडण्यात आले. पुढील तपास बिट जमादार गोंडाणे, पोलीस कॉन्स्टेबल चुटे करीत आहेत. या गैरप्रकारामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पोलीस पाटील सावरबांधे यांना हटविण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)