लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : खडकपूर येथून रेल्वेने एक १३ वर्षीय परप्रांतीय मुलगा तुमसर रोड रेल्वे स्थानकावर उतरला. दुसºया दिवशी देव्हाडी येथील तिघांनी रेल्वे सुरक्षा बल तथा देव्हाडी पोलीस दूरकेंद्राशी संपर्क साधून मुलाच्या पालकांशी संपर्क साधला. त्यानंतर मुलाला पालकांच्या स्वाधीन केले. तीन युवकांनी पुढाकार घेतल्याने मुलगा सुखरुप घरी परतला.साहिल राजेश अग्रवाल रा. खडकपूर असे मुलाचे नाव आहे. साहिल कुटुंबासोबत कोलकाता येथे फिरायला गेला होता. परतीच्या मार्गावर साहिल दुसºया रेल्वेत बसला. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दोन दिवसानंतर तो उतरला. दुसºया दिवशी रेल्वे समितीचे सदस्य आलम खान, महेश बिरणवारे, राजू ठाकुर यांच्या नजरेस साहिल रडताना दिसला. तिथे पोलिसांनी साहिलची विचारपूस केली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधला. रेल्वे सुरक्षा दलाचे प्रमुख एच.एन. सहा यांनी खडकपूर रेल्वे स्थानकाशी संपर्क साधून साहिलची माहिती दिली. साहिलचे वडील तुमसर रोड येथे पोहचल्यावर साहिलला वडीलांकडे सुपूर्द केले. रेल्वे सुरक्षा दल अधिकारी व स्थानिक तीन युवकांना साहिलने मिठी मारली. तीन युवकांच्या प्रयत्नामुळेच साहिल सुखरुप घरी पोहचला.
खडकपूरचा साहिल घरी परतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:13 IST
खडकपूर येथून रेल्वेने एक १३ वर्षीय परप्रांतीय मुलगा तुमसर रोड रेल्वे स्थानकावर उतरला. दुसºया दिवशी देव्हाडी येथील तिघांनी रेल्वे सुरक्षा बल तथा देव्हाडी पोलीस दूरकेंद्राशी संपर्क साधून मुलाच्या पालकांशी संपर्क साधला.
खडकपूरचा साहिल घरी परतला
ठळक मुद्देतुमसर येथील घटना : रेल्वे सुरक्षा दल, युवकांचा पुढाकार