शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी पवनीच्या पुतळ्यात सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:32 IST

कोट्यवधी दिनदुबळ्या बहुजनांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि आजही पवनी शहरात बाबासाहेबांच्या संगमवरील पुतळ्यात सुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थि असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.

ठळक मुद्देआज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : महाराष्ट्रातील एकमेव पुतळा

लक्ष्मीकांत तागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : कोट्यवधी दिनदुबळ्या बहुजनांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि आजही पवनी शहरात बाबासाहेबांच्या संगमवरील पुतळ्यात सुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थि असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महानिर्वाण झाले. पवनी येथील नागरिक सध्याच्या डॉ. आंबेडकर चौकात एकत्र आले. तेथे एका व्यापाऱ्याच्या घरासमोरून रेडियोवरून ही दु:खत बातमी ऐकली. अनेकजण धायमोकलून रडू लागले. जवळच राघो गजभिये यांच्या घरासमोर श्रावण मयुर गुरूजी यांनी शोक सभा घेतली.त्यावेळेस शुक्रवारी वॉर्डातील पिठूजी राऊत यांचे चांगले प्रस्थ होते. या वॉर्डातील डॉ. रविंद्र राऊत, विजय रामटेके, सुखदेव मानवटकर नागपूर येथे शिक्षण घेत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणाची माहिती होताच हे तीनही युवक नागपूरवरून मुंबईला गेले. सरळ दादर चैत्य भूमीवर गेले. त्या ठिकाणी राखेला वंदन करून राख माथ्याला लावली. पण सुखदेव मानवटकर यांनी राखेत हात टाकताच त्यांच्या हाताला अस्थिचा एक तुकडा लागला. हा तुकडा चुपचाप पॅन्टच्या खिशात ठेवला. नंतर ही गोष्ट मित्रांना सांगितली. ही अस्थी त्यांनी पवनी येथे येवून पिठूजी राऊत यांच्याकडे सोपविली. ती त्यांनी आपल्याकडे सुरक्षीत ठेवली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर पवनी शहरात बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्ते एकत्र आले. शहराच्या मध्यवर्ती भागात बाबासाहेबांचा पुतळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुतळ्याकरिता लोकवर्गणी गोळा करण्यात आली. काही जणांनी आपल्या घरावरचे टीन विकून वर्गणी दिली.प्रत्येकाने पुतळ्यासाठी यथाशक्ती वर्गणी दिली. राघोजी गजभिये यांनी जागा दान दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जयपूरवरून आणण्याचे निश्चित झाले. जयपूर येथील कलावंतांनी संगमरमरात बाबासाहेबांचा देखणा पुतळा तयार केला. आता हा पुतळा पवनीच्या वैभवात भर घालीत आहे. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थि या पुतळ्यात असल्याने प्रत्येकजण येथे नतमस्तक होवून बाबासाहेबांना अभिवादन करतात.बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांनी केले होते अनावरणडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयपूरवरून आणलेला पुतळा पवनी येथील मुख्य चौकात बसविण्यात आला. त्यावेळी बाबासाहेबांच्या अस्थीचा अर्धा भाग या पुतळ्यात ठेवण्यात आला व अर्धा भाग पुठूजी यांनी आपल्याकडे सुरक्षित ठेवला. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण २६ नोव्हेंबर १९६२ रोजी राज्यसभेचे तत्कालीन उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. आज हा पुतळा पवनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभा आहे. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर