शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पाणीपुरवठा योजना गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:34 IST

सिलेगाव येथील प्रकार : गावात खाऱ्या पाण्याचे स्त्रोत, येरली प्रादेशिक योजनेला गाव संलग्नितरंजीत चिंचखेडे ।आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : शासन आणि प्रशासनाचे उदासिनतेमुळे सिलेगावात असणारी ग्रामीण पाणीपुरवठा योजना गुंडाळण्यात आली आहे. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी येरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला संलग्नीत करण्यात आले असले तरी, गावकरी विरोध करीत आहे. गावात स्वतंत्र नळ योजना ...

सिलेगाव येथील प्रकार : गावात खाऱ्या पाण्याचे स्त्रोत, येरली प्रादेशिक योजनेला गाव संलग्नितरंजीत चिंचखेडे ।आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : शासन आणि प्रशासनाचे उदासिनतेमुळे सिलेगावात असणारी ग्रामीण पाणीपुरवठा योजना गुंडाळण्यात आली आहे. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी येरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला संलग्नीत करण्यात आले असले तरी, गावकरी विरोध करीत आहे. गावात स्वतंत्र नळ योजना मंजुर करण्याची मागणी आहे.पंचायत समिती क्षेत्र असणाऱ्या सिलेगावात पिण्याचे पाण्याचे संकट आहे. या गावात खाऱ्या पाण्याचे स्त्रात आहेत. गावात उपलब्ध होणारे पाणी घरगुती उपयोगात आणले जात नाही. या पाण्याला जनावरे ही नापसंती दाखवित आहेत. गाव शेजारी शेत शिवारातील असणाऱ्या विहिरीचे पाणी आणले जात आहे. २ किमी अंतर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गाठावे लागत आहे. गावात साधे पिण्याचे पाणी प्राप्त होत नसल्याने गावकरी त्रस्त झाली आहेत. यामुळे गावात पंधरा वर्षापुर्वी ग्रामीण नळ योजना मंजुर करण्यात आली आहे.वैनगंगा नदी काठावरील वांगी गावाचे शेजारी योजनेला पंपगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. या योजनेने काही वर्ष गावकऱ्यांची तहान भागविली आहे. या नळ योजनेवर ग्राम पंचायतचे नियंत्रण होते. पंरतु तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने या नळ योजनेत असणाºया तांत्रिक समस्या निकाली काढण्याकडे दुर्लक्ष केले. गावकऱ्यांना गोड पाणी उपलब्ध करणारी ग्रामीण पाणीपुरवठा योजना भंगारात गेली. तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाचे निष्क्रियतेमुळे गावकºयांवर नविन सकंट निर्माण झाले आहे. गावकºयांचे हक्काचे योजना प्रशासनाने दुर्लक्षापणामुळे गुडाळण्यात आली असता, योजना पुर्नजीवीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही. गावात ग्रामीण पाणीपुरवठा योजना बंद होताच गोड पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती सुरु झाली. हे गंभीर संकट असल्याचे कारणावरुन लोकप्रतिनिधीनी येरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला गाव संलग्नीत करण्यासाठी प्रयत्न केले आहे.गावात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची अभिनव टाकीला पाईप जोडण्यात आली आहे. जुनेच गावात योजनेचे नळ आहे. यामुळे गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी उपाय शोधण्यात आला असला तरी गावाला संलग्नीत केल्याने अन्याय करण्यात आलेला आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला गाव जोडण्यात आल्याने गावात स्वतंत्र नळ योजना मंजुर करतांना अडचणी निर्माण झाली आहे.येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला संलग्नीत असणाऱ्या गावात पाण्याचे तात्पुरते स्त्रोत निर्माण करण्यात येत आहेत. योजना बंद असल्यास गावकºयांना पाण्ी मिळणार असून योजनेकरिता ४ लाखांचा निधी खेचून आणला आहे.- प्रतिक्षा कटरे, जि.प. सदस्य चुल्हाडसिलेगाव येथील बंद असणाºया नळ योजनेला सुरु करण्यासाठी ग्राम पंचायतला प्रस्ताव आलेला आहे. नाल्या लगत असणारी जागा निश्चित करण्यात आली असून ३२ लाख रुपये खर्चाचा अंदाजपत्रक मंजुरी करिता पाठविण्यात आला आहे.- डी. बी. बावनकर, उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा विभाग पं.स. तुमसर