शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

अधिक व्याजाचे आमिष देऊन ७२ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:00 IST

गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन झाल्याने आणखी रक्कम गुंतविली. रेणूबाई सुवालाल ठाकरे १रा. चिंचोली ता. तुमसर) यांच्यासह सुमारे ५० जणांनी रक्कम गुंतविली. मात्र त्यानंतर कंपनीने पैसे देणे बंद केले. दीड वर्षांपूर्वी अचानक कंपनीने तुमसर येथील सिंधी धर्मशाळेजवळ असलेले कार्यालय बंद केले. एजंटांच्या माध्यमातून पैसा गुंतवणाऱ्यांनी प्रथम एजंटांकडे विचारपूस केली. मात्र, त्यांनी हात वर केले. या कंपनीने ७२ लाख २० हजार २९७ रुपयांची आवर्ती ठेव व मुदत ठेव स्वरूपात फसवणूक केल्याचे पुढे आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अधिक व्याजाचे आमिष दाखवून  गुंतवणूकदारांची फसवणूक करून ७२ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार तुमसर तालुक्यात उघडकीस आला आहे. भाेपाळच्या तनिष्क इन्फ्रा इस्टेट कंपनीने सुमारे ५० जणांची फसवणूक केली असून याप्रकरणी तुमसर ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र पूनमचंद जायस्वाल (२९), सुनीता देवेंद्र जयस्वाल (२९), दिनेश वर्मा (४०, तिघे राहणार खिचीपूर मध्यप्रदेश), विनोद बळिराम कुर्वे (३५, रा. बोंनकट्टा ता. तिरोडी, जि. बालाघाट), पन्नालाल रूपचंद उपवनशी (४५, रा. पिपरटोला, ता. गोंदिया), मोहन सुकराम मुटकुरे, (४०, रा. वेलकम कॉलनी, भंडारा), चंद्रशेखर शंकरराव बावनकुळे (४५, रा. सुभाष वाॅर्ड, भंडारा), अशोक सोनी (३५, रा. बोंनकट्टा, ता. तिरोडी, जि. बालाघाट) अशी आरोपींची नावे आहेत. त्याच्याविरुद्ध भांदवी ४२०, ४०६, ४०९, ३४, सहा कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तनिष्क इन्फ्रा इस्टेट लिमिटेड, ३१७ आकांक्षा प्रेस कॉम्प्लेक्स झोन १, एमपीनगर भोपाल या नावाने कंपनी स्थापन करण्यात आली होती. तुमसर तालुक्यात या कंपनीने अधिक व्याजाचे आमिष देत अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. अनेकांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतविले. गुंतवणूक केलेल्या पैशांची काही काळापर्यंत कंपनीने परतफेड केली. त्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन झाल्याने आणखी रक्कम गुंतविली. रेणूबाई सुवालाल ठाकरे १रा. चिंचोली ता. तुमसर) यांच्यासह सुमारे ५० जणांनी रक्कम गुंतविली. मात्र त्यानंतर कंपनीने पैसे देणे बंद केले. दीड वर्षांपूर्वी अचानक कंपनीने तुमसर येथील सिंधी धर्मशाळेजवळ असलेले कार्यालय बंद केले. एजंटांच्या माध्यमातून पैसा गुंतवणाऱ्यांनी प्रथम एजंटांकडे विचारपूस केली. मात्र, त्यांनी हात वर केले. या कंपनीने ७२ लाख २० हजार २९७ रुपयांची आवर्ती ठेव व मुदत ठेव स्वरूपात फसवणूक केल्याचे पुढे आले. अखेर बुधवारी या प्रकरणी रेणूबाई ठाकरे यांनी तक्रार दाखल केली. 

एजंटांच्या माध्यमातून दाखविले आमिष- स्थानिक एजंटांच्या माध्यमातून या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना अधिक व्याजाचे आमिष दाखवले. तुमसर, चिचोली व तिरोडा येथील तीन एजंटांनी सुमारे ५० गुंतवणूकदारांकडून पैसा गोळा केला होता. २०१५ पासून रक्कम जमा करण्यात येत हाती. मात्र, आता त्यांची फसवणूक झाली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून तपास पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर करत आहेत.

दीड वर्षापूर्वीच गुंडाळले तुमसरचे कार्यालय- भाेपाळ येथील तनिष्क इन्फ्रा इस्टेट लिमिटेड या कंपनीने तुमसर येथील सिंधी धर्मशाळेजवळ कार्यालय थाटले हाेते. दीड वर्षापुर्वीच कार्यालय गुंडाळून कंपनीने पाेबारा केला हाेता. मात्र आपले पैसे मिळतील या आशेने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रार केली नाही. मात्र आता तक्रार दाखल केली.

 

टॅग्स :fraudधोकेबाजी