शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

रोहयोच्या विहिरींना ११ गावे मुकणार

By admin | Updated: January 11, 2016 00:30 IST

राज्य शासनाने रोहयोमध्ये थेट विहिर बांधकामाला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचे नियोजन असले ...

२३७ विहिरीचे नियोजन : उदासीनता कारणीभूतरंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)राज्य शासनाने रोहयोमध्ये थेट विहिर बांधकामाला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचे नियोजन असले तरी तुमसर तालुक्यातील ११ गावातुन विहिर मंजुरीचे प्रस्तावच देण्यात आले नाही. यामुळे ग्राम पंचायतीची उदासिनता दिसून आली आहे. यात सिहोरा परिसरातील सात गावांचा समावेश आहे.रोहयो योजनेत कुशल आणि अकुशल कामाचे नियोजन करण्यात येत आहे. या योजनेत आधी सिमेंट रस्ते व नाली बांधकाम करण्यात आली आहेत. अनेक गावात सिमेंट रस्ते व समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. गावात वर्दळ नसतांना ही अशा जागेत सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाली आहेत. यामुळे शासनाचा निधी व्यर्थ गेला आहे. यामुळे रोहयो योजना शेतकऱ्यांचे शेत शिवारात राबवण्यिाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. रोहयो अंतर्गत विहिर बांधकाम करण्यासाठी तीन लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध केला जाणार आहे. यात दोन लाखांचे कुशल व एक लाख खर्चाचे अकुशल कामे केली जाणार असुन मजुराच्या हाताला काम मिळणार आहे. या योजनेत प्रस्ताव मागविण्यात आले असून तुमसर पंचायत समिती अंतर्गत ३२७ विहिर बांधकाम मंजुरीचे नियोजन करण्यात आले आहे. यात गाव निहाय बपेरा, ढोरवाडा व बोरगाव येथे एक, बाम्हणी, चुल्हाड, देवरीदेव, गर्रा बघेडा, धुटेरा, हरदोली (आ), कर्कापुर, खापा, कोष्टी, मच्छेरा, मांगली (दे), परसवाडा, साखडी, सिहोरा, तामसवाडी, उमरवाडा, येदरबुची, कारली, परसवाडा येथे दोन विहिरी, आलेसुर, चारगाव, चिखली, देव्हाडी, डोंगरी बु., धनेगाव, हसारा, कुरमुडा, मांगली, मोहगाव, पाथरी, पवनारा, पवनारखारी, पिपरा, पिटेसुर, राजापुर, रनेरा, रुपेरा, सिंदपुरी, सितासावंगी, सोरना, टेमनी येथे तीन विहिरी, आंबागड, बोरी, चुल्हारडोह, दावेझरी, देवसर्रा, हिंगणा, खरबी, महालगाव, मुरर्ली, सोनेगाव, सुकळी, वाहनी येथे चार विहीरी, डोंगरला, कवलेवाडा, मिटेवानी, नाकाडोंगरी, पांजरा, सिलेगाव येथे पाच विहिरी, चांदपुर, चिचोली, देवनारा, गोबरवाही, गोंदेखारी, गुडसे, हरदोली, खैरलांजी, लोभी, लोहारा, मांडगी, मोहाडी, मोहगाव (ख.), पचारा येथे सहा विहिरी, आसलपानी, आष्टी, रोंघा येथे सात विहिरी, चिखला येथे १० तर येरली येथे ११ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.दरम्यान बाळापुर, बपेरा (सि.), बिनाखी, गोंडीटोला, नवरगाव, पवनारा, पिपरी (चुन्ही), सितेपार, सोंड्या, स्टेशनटोली, सुकडी (नकुल), सुसुरडोह, तुकडा, वारपिंडकेपार अशा ११ गावांचे शेतकऱ्यांना विहिर मजुरींचे प्रस्ताव आले नसल्याने नियोजन तयार करण्यात आले नाही. यामुळे या गावातील शेतकरी विहिर बांधकामाला मुकणार आहेत.