शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर

By admin | Updated: January 27, 2015 23:28 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत यावर्षी जिल्हयातील २ लाख ९६ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याद्वारे ४८.८७ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती झाली असून

भंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत यावर्षी जिल्हयातील २ लाख ९६ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याद्वारे ४८.८७ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती झाली असून यात भंडारा जिल्हा राज्यात रोजगार उपलब्ध करुन देण्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६५ वा वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय समारंभ पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. या संमारंभाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वंदना वंजारी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधिक्षक कैलास कणसे यांच्यासह सर्व विभागप्रमुख तथा पोलिस गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊटगाईड यांच्यासह गणमान्य नागरिकही उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी पुढे बोलताना, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राज्यशासनाकडून राबविण्यात येत आहे. जिल्हयातील मकरधोकडा या गावापासून याचा शुभारंभ करण्यात येत आहे. जिल्हयातील ४६ गावांचा यात समावेश करण्यात आला असून शिवारफेरीही पार पडली आहे. खरीप हंगामात जिल्हयातील १५४ गावांची अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. त्यामुळे ही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहे. सध्याच्या टंचाईसृदष्य परिस्थितीवर १०५ गावातील १३,६०६ बाधीत शेतकऱ्यांना ४ कोटी ५५ लाख ९९ हजार रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. कृषी संजीवनी योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. थकबाकी कृषि धारकांनी ५० टक्के रकम भरुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केला. कृषि पंपाचा अनुशेष दुर करण्यासाठी राज्य शासन विदर्भात ५ लक्ष सोलर कृषिपंपाचा पुरवठा अनुदान तत्वावर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे स्वच्छतेचा संदेश, उपप्रादेशिक परिवहन विभागतर्फे रस्ता सुरक्षेबाबत, पोलिस विभागातर्फे जाती सलोखा राखण्याबाबत जनजागृती करणारे चित्ररथ काढण्यात आले. उत्कृष्ठ पथसंचालनासाठी जे.एम. पटेल महाविद्यालयानी प्रथम, नुतन कन्या विद्यालयाने द्वितीय तर सैनिक विद्यालय लाखनी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. यांना बक्षीस व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार सरला शणवारे, मिरा भट्ट यांना धनादेश, शाल श्रीफळ व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला स्वतांत्र संग्राम सैनिक, लोकप्रतिनिध यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)