शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

एकोडीत विविध मागण्यांसाठी शेतमजुरांचा रस्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे तालुकाध्यक्ष वसंता भुरे, तालुका सचिव किशोर बारस्कर, शेतमजूर युनियनचे तालुकाध्यक्ष दिलीप उंदिरवाडे, सचिव राजू बडोले, भारतीय महिला फेडरेशनच्या देवांगणा सयाम, अपंग संघटनेचे चरणदास सोनवाने यांनी केले. यावेळी भाकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांनी मार्गदर्शन केले. सदर आंदोलन गत २८ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात, तसेच अतिक्रमणधारकांना जमिनीचे व घराचे पट्टे मिळावे, अतिक्रमण धारकांचे धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात यावे,.....

ठळक मुद्देआंदोलनाकडे प्रशासनाची पाठ : तीव्र आंदोलनाचा पदाधिकाऱ्यांचा इशारा

लाेकमत न्यूज नेटवर्कसाकाेली : तालुक्यातील तुकडोजी चौक एकोडी येथे महाराष्ट्र राज्य किसान सभा, महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन, भारतीय महिला फेडरेशनच्या साकोली तालुका शाखेतर्फे दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ व विविध मागण्यांसाठी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे तालुकाध्यक्ष वसंता भुरे, तालुका सचिव किशोर बारस्कर, शेतमजूर युनियनचे तालुकाध्यक्ष दिलीप उंदिरवाडे, सचिव राजू बडोले, भारतीय महिला फेडरेशनच्या देवांगणा सयाम, अपंग संघटनेचे चरणदास सोनवाने यांनी केले. यावेळी भाकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांनी मार्गदर्शन केले. सदर आंदोलन गत २८ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात, तसेच अतिक्रमणधारकांना जमिनीचे व घराचे पट्टे मिळावे, अतिक्रमण धारकांचे धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात यावे, अ, ब, क, ड यादीतील सर्वांना घरकुल देण्यात यावे, सुरु असलेल्या घरकुलाची थकीत किस्त तात्काळ देण्यात यावी, कुटुंब विस्तार अंतर्गत वरच्या मजल्यावर घरकुल देण्यात यावे, वृद्ध, निराधार, विधवा, अपंग यांच्या वर्तमान अर्थसहाय्यात वाढ करून ती तात्काळ किमान दोन हजार रुपये करण्यात यावी, रेशन दुकानातून नियमित रेशन देण्यात यावे, पाच किलो राशन मोफत सुरू ठेवावे, एकोडी येथे धान केंद्र सुरू करावे,  शेतीकामाचे हंगाम संपत आले आहे, तेव्हा मागेल त्याला रोजगार हमीचे काम देण्यात यावे व त्यासाठी काम मागणीचे अर्ज नमुना चार पुरवुन रोजगार सेवक किंवा ग्रामपंचायत सचिवाद्वारे ते नियमित स्विकारण्यात येवुन नमुना पाचची पावती देण्यात यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले . कडाक्याच्या थंडीत लाखो शेतकऱ्यांना लहान मुला बाळासह वृद्ध माता पित्यासह आपले आंदोलन असेच सुरू ठेवावे लागले तर साकोली तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीवर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ व विविध मागण्यांना घेऊन पाच जानेवारी ते २४ जानेवारीपर्यंत मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात येईल. २५ जानेवारीला साकोली तहसील कचेरीसमोर पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात  येईल, असा इशारा यावेळी आंदोलर्त्यांनी दिला. रास्ता रोको आंदोलनाची पोलीस विभागाने दखल घेऊन बंदोबस्तावर अधिकारी, कर्मचारी तैनात होते. पण तहसीलदार यांनी आंदोलनाची दखल घेतली नाही. याचा निषेध करुन २८ डिसेंबर रोजी काळी पट्टी लावुन एका शिष्टमंडळाव्दारे त्यांना निवेदन दिले जाईल. आंदोलनात  नितीन वासनिक, बाळकृष्ण कापसे, दयाराम लंजे, चैतराम नेवारे, मनोहर बडोले यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनChakka jamचक्काजाम