शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

रस्ते जीर्ण अन् नागरिक त्रस्त

By admin | Updated: April 25, 2015 00:47 IST

शहराच्या पश्चिमेकडे सिंधी कॉलनीच्या सुरूवातीला माता भवानी चौकापासून मूर्री रेल्वे क्रॉसिंगपर्यंत रस्त्याची स्थिती अत्यंत जीर्ण झाली आहे.

नागरिकांचा रोष : पोस्टर फाडल्यावर पुन्हा निषेध पोस्टर लागणारगोंदिया : शहराच्या पश्चिमेकडे सिंधी कॉलनीच्या सुरूवातीला माता भवानी चौकापासून मूर्री रेल्वे क्रॉसिंगपर्यंत रस्त्याची स्थिती अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठाच रोष आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची न.प. चे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी दिशाभूल केल्याने आखणी रोष वाढला आहे.स्थानिक नागरिकांनी सांगितले की, माता भवानी चौकापासून मूर्री रेल्वे क्रॉसिंगपर्यंत जवळपास तीन किमीपर्यंत रस्ता जीर्णावस्थेत आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी न.प. चे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गुढीपाडव्यापर्यंत रस्ता दुरूस्ती करू, असे सांगितले होते. मात्र गुढीपाडवा लोटून महिनाभराला कालावधी लोटला असून सदर रस्ता दुरूस्तीचे काम अद्याप करण्यात आले नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.सदर रस्त्याचे निरीक्षण केल्यावर १० ते २० फुटापर्यंत अनेक ठिकाणी डांबरीकरण दिसून येत नाही. रस्त्यावर लहान-मोठे अनेक खड्डे आहेत. यासह दोन ठिकाणी रस्त्यावर रस्ता दुभाजक लावण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचे चौपदरीकरण कमी झाले आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांना ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. रस्ता दुभाजक एवढे तीक्ष्ण बनले आहेत की, त्यावर एखादा आदळला की तो गंभीर जखमी झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच डिव्हायडरच्या दोन्हीकडे फलकसुद्धा लावण्यात आले नाही. पथदिवे बंद असल्यावर रस्ता दुभाजकांवर नेहमी सायकलस्वार आदळताना दिसतात. सदर रस्त्यावरून अवजड वाहने एफसीआयपर्यंत जातात. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत आणखी वाढ होत आहे. रस्त्यावरची गिट्टीसुद्धा उखडून रस्त्यावर पसरलेली दिसते. वाहनांच्या सततच्या ये-जामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असते. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठाच रोष दिसून येत आहे. हा रस्ता व सदर रस्ता दुभाजक नेहमीच अपघाताला आमंत्रण देत आहे. आता जर सदर रस्ता दुरूस्त करण्यात आला नाही तर पावसाळ्यात या रस्त्यावरून चालनेसुद्धा कठिण होईल, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)पोस्टर फाडले, पुन्हा लागणारसदर रस्त्याबाबत रोष व्यक्त करणाऱ्या नागरिकांनी शनिवार (दि.१८) एक पोस्टर लावले होते. काही खोडकर लोकांनी सदर पोस्टर फाडले होते. आता नागरिक पुन्हा तसाच पोस्टर लावण्याच्या तयारीत आहेत. यात लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. नवीन जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांची अपेक्षातत्कालीन जिल्हाधिकारी अमिती सैनी यांना दिलेल्या निवेदनाच्या आधारावर नवीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी न.प. चे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्यावर सदर रस्ता दुरूस्त न केल्यामुळे कारवाई करतील काय? असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.