शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बेस झालं बाबा निवडणूक आली... रस्ते झाले गुळगुळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 13:55 IST

पावसाळ्यात खड्ड्यात पाणी, पाण्यात वाहन चालवून प्रवास करणारे शिव्या देत वाहन पुढे नेत घर जवळ करतात; राज्यमार्गाने जाणाऱ्या अनेकांनी हे अनुभवले आहे. पण, मंत्र्यांचा दौरा असला की तत्काळ खड्डे बुजवले जातात.

ठळक मुद्देअसेच या नेत्यांनो : सावध भूमिका घेत बांधकाम विभागाने बुजविले खड्डे

राजू बांते

भंडारा : तुमसर ते भंडारा या रस्त्यावर वर्षभर खड्डे चुकवत प्रवास करणाऱ्यांच्या तोंडातून स्वाभाविकच वाक्य पडत आहेत ‘बेस झाली बाबा निवडणूक आली, असेच नेते येऊ देत या मार्गाने.’ निवडणुकीच्या काळात रस्ते गुळगुळीत झाल्याने सर्वांनाच रस्त्यावरील खड्ड्याने नव्हे, तर आर्श्चयाचा सुखद धक्का बसत आहे.

तुमसर- मोहाडी- भंडारा या मार्गाने वर्षभर खड्डे पडलेले असतात. त्या खड्ड्यांना चुकवत प्रवास करावा लागत असतो. याच खड्ड्यांनी अनेकांची हाडे मोडली, कधी जीवही घेतला; पण सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होत नाही. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी, पाण्यात वाहन चालवून प्रवास करणारे शिव्या देत वाहन पुढे नेत घर जवळ करतात; राज्यमार्गाने जाणाऱ्या अनेकांनी हे अनुभवले आहे. पण, मंत्र्यांचा दौरा असला की तत्काळ खड्डे बुजवले जातात. कधी मुरमाने तर कधी डांबर फासून रस्ते नीट केले जातात. मंत्र्यांचा वाहनांना धक्के लागू नये याची किती काळजी प्रशासन घेत असते.

निवडणूक आली की मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा होतात याची पूर्वकल्पना प्रशासनाला असते. आपली मंत्र्यांनी कानउघाडणी करू नये, याची भीती बांधकाम विभागाला असते. या भीतीपोटी आधीच सावध भूमिका घेत बांधकाम विभागाचे अधिकारी आपले कार्य चोख बजावत असतात. आताच हेच बघा, स्थानिक स्वाराज्य संस्थांची निवडणूक घोषित होताच मोहाडी- भंडारा मार्गावरील खड्डे, रस्ते डांबराने व्यवस्थित करणे सुरू झाले. या मार्गाने मुंबई, दिल्ली, नागपूर येथील मोठे नेते येणार याची प्रशासनाला कल्पना होती. त्यामुळे अगदी वेगाने रस्ते नीट करण्याचे काम बांधकाम विभागाने घेतले.

आश्चर्य काय, नेत्यांच्या प्रचाराचा दिवस उजाडण्याच्या अगोदरच रस्ते गुळगुळीत करण्यात आले आहेत. पावसाळ्यानंतर लगेच खड्डेभरणी झाली नाही. निवडणूक लागताच बांधकाम विभागाला कशी जाग आली, असे प्रश्न वाहनधारकांच्या मनात येत आहेत. आता तर, मंत्री, मोठ्या पुढाऱ्यांनी नेहमीच या मार्गाने यावे. ग्रामीण भागातील जनता मात्र आपल्या बोलीभाषेत म्हणत आहेत, ‘बेस झालं बाबा निवडणूक आली. रस्ते मस्त बुजले, रस्ता चिकन झाला’, तसेच नेत्यांनी या मार्गाने नेहमीच यावे अशीही देवाला प्रार्थना वाहन चालकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :Potholeखड्डेroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक