शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोंढा येथे रस्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:48 IST

येथील डॉ. अरुणा मोटघरे महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थापक यांनी ग्रा. पं. कोसरा येथील पदाधिकाऱ्यांना धमकी दिली. तसेच कर्मचारी भाऊराव पंचवटे यांच्यावर होत असलेला अन्याय आणि येथे विद्यार्थ्यांवर होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीच्या विरोधात शिवसेनेतर्फे गुरुवारला कॉलेजसमोरील राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देशिवसेनेचा पुढाकार : प्रकरण लिपिकावरील अन्यायाचे

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : येथील डॉ. अरुणा मोटघरे महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थापक यांनी ग्रा. पं. कोसरा येथील पदाधिकाऱ्यांना धमकी दिली. तसेच कर्मचारी भाऊराव पंचवटे यांच्यावर होत असलेला अन्याय आणि येथे विद्यार्थ्यांवर होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीच्या विरोधात शिवसेनेतर्फे गुरुवारला कॉलेजसमोरील राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या मदतीने आंदोलन थांबविण्यात आले.डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय कोंढा-कोसरा हे राज्यमार्गावर आहे. तिथे वर्ग ११ ते वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थी घेत असतात. तसेच येथे अनेक प्रकारचे व्यावसायीक अभ्यासक्रम चालविले जाते. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट केली जात असल्याची तक्रार पवनी तालुका शिवसेनेकडे विद्यार्थ्यांनी केली. महाविद्यालयाच्या समोर वनविभागाच्या खुल्या जागेतून नेरला उपसा सिंचन योजनेची कोसरा वितरिकेचे बांधकाम जाणार आहे. ते बांधकाम प्राचार्य व संस्थापकाने धाक दाखवून अडविले. मागील आठवड्यात हे काम कंत्राटदार रामसिंग बैस यांनी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देखील वाद केला, तेव्हा कोसरा येथील ग्रा. पं. पदाधिकारी व गावकरी यांचेसोबत वाद केला. संस्थेचे कर्मचारी भाऊराव अन्यायाविरोधात पुन्हा आमरण उपोषण २० फेब्रुवारीपासून सुरु केले होते. संस्थापक व प्राचार्यांच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तालुका शिवसेना प्रमुख विजय काटेखाये, शिवाजी फंदी, प्रशांत भुते, सुधाकर साठवणे तसेच कोंढा येथील ग्रामपंचायत उपसरपंच जितेंद्र लिचडे, ग्रा. पं. सदस्य अमित जिभकाटे, ज्ञानदेव कुर्झेकर व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन डॉ. मोटघरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे, अशी मागणी केली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना