शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बनला रेतीचा डम्पिंग यार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:47 IST

जिल्ह्यातील सर्वच रेतीघाट सध्या बंद आहेत. ३० सप्टेंबर रोजी रेतीघाटांची मुदत संपली. परंतु तुमसर तालुक्यातील डोंगरला-नवरगाव रस्त्यावर सुमारे १५० ते २०० ब्रास रेतीचा अवैध साठा करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१५० ते २०० ब्रास रेती : डोंगरला-नवरगाव पांदण रस्त्यावर रेतीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जिल्ह्यातील सर्वच रेतीघाट सध्या बंद आहेत. ३० सप्टेंबर रोजी रेतीघाटांची मुदत संपली. परंतु तुमसर तालुक्यातील डोंगरला-नवरगाव रस्त्यावर सुमारे १५० ते २०० ब्रास रेतीचा अवैध साठा करण्यात आला आहे. तलाठी व मंडळ अधिकाºयांचे संगनमत व तहसीलदारांचा आशीर्वादामुळे हा गोरखधंदा सुरू असल्याचे समजते. तुमसर शहरापासून अवघ्या तीन कि़मी. अंतरावर हा प्रकार सध्या सुरू आहे. रेतीघाट बंद असल्याने ही रेती आणली कुठून व त्याची रॉयल्टी मिळाली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तुमसर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील रेतीघाटांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपला. रेतीघाट लिलावाची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. डोंगरला-नवरगाव पांदन रस्त्याशेजारी रेतीसाठा करून ठेवला आहे. अवैध रेती खननाचा हा प्रकार आहे. तामसवाडी रेती घाटातून अवैध रेती उपसा करून ठेवली का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. डोंगरला गावातही रेतीचे साठे असल्याचे समजते. रेतीसाठा करून ठेवणे गैर नाही. परंतु रेतीची रॉयल्टी आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. रेतीसाठा करण्याची पूर्वपरवानगी महसूल प्रशानाची घेतली का, हा खरा प्रश्न आहे.तामसवाडी (सि.) व पांजरा रेती घाटावरून रात्रीच्या सुमारास सर्रास अवैध रेती खनन सुरू असल्याची माहिती आहे. रेती सार्वजनिक अथवा खाजगी कामाकरिता आणली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणातील रेती साठ्यांची शासकीय परवानगी नियमानुसार घेतली काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलाठी व मंडळ अधिकाºयांची येथे मुकसंमती दिसून येत असून या प्रकाराला तहसील प्रशासनाचे पाठबळ दिसून येत आहे. काही मंडळाकरिता एका नायब तहसीलदारांकडे ही जबाबदारी सोपविण्यात येते. रेती खनन गौण खनीज अवैध आहे का, याची चौकशी ते करतात. या प्रकाराची चौकशी कुणी केली हा संशोधनाचा विषय आहे. डोंगरला गावातील रेतीसाठा संशयाच्या भोवºयात आहे. कर्तव्यदक्ष व नियमावर बोट ठेऊन नियमांचा हवाला देणाºया तहसीलदारांनी येथे चौकशी करून कारवाई करण्याची गरज आहे.