शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांचे धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

राष्ट्रीय महामार्गासह राज्य आणि जिल्हा मार्गही आहे. या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते; परंतु राज्य आणि जिल्हा मार्गांची अवस्था गत काही वर्षांपासून दयनीय झाली आहे. रेतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांबाबत तर विचारायची सोय नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यावरून ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. बांधकाम विभाग रस्त्यांची डागडुजी करते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षी पावसाळा आला की, रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. ठिकठिकाणचे रस्ते उखडतात. रस्त्यावरून चालणे कठीण होते. पावसामुळे रस्ते खड्येमय झाल्याची बोंब ठोकली जाते. मात्र, रस्त्यांचे खरे धिंडवडे ओव्हरलोड वाहतुकीने त्यातही रेतीच्या वाहनांमुळे निघत आहेत. ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आरटीओची असली तरी खड्डेमय रस्त्यांच्या डागडुजीचा फटका सार्वजनिक बांधकाम विभागाला बसतो. भंडारा जिल्ह्यात रस्त्याचे जाळे सर्वदूर पसरले आहेत. राष्ट्रीय महामार्गासह राज्य आणि जिल्हा मार्गही आहे. या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते; परंतु राज्य आणि जिल्हा मार्गांची अवस्था गत काही वर्षांपासून दयनीय झाली आहे. रेतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांबाबत तर विचारायची सोय नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यावरून ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. बांधकाम विभाग रस्त्यांची डागडुजी करते. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे’ होते. पावसाळ्याच्या काळात तर हमखास रस्ते उखडतात. रस्ते उखडले की पावसाळ्याचे कारण पुढे करून त्यावर पांघरूण घातले जाते. मात्र, ओव्हरलोड वाहतुकीचा कुणीही उल्लेख करीत नाही. ३० ते ४० टन वजन घेऊन वाहने धावत असतात. यामुळे रस्ते पूर्णत: नादुरुस्त होत आहेत. ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी परिवहन विभागाची आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची आरटीओकडून नियमित तपासणी केली जाते; परंतु राज्य आणि जिल्हा मार्गावर धावणाऱ्या वाहनांची कधीच तपासणी होत नाही. आरटीओची जबाबदारी असली तरी रस्ता दुरुस्तीचा भुर्दंड मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला सहन करावा लागतो. नागरिकांच्या रोषाचाही सामना याच विभागाला करावा लागतो. भंडारा जिल्ह्यातून करचखेडा-करडी, विरली-लाखांदूर, तुमसर-रोहा, मोहाडी-रोहा, बपेरा-तुमसर, भंडारा-वरठी, तुमसर-गोंदिया यासह अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. रस्त्याच्या डागडुजीबाबत नागरिक नेहमी आक्रमक असतात; परंतु डागडुजी केल्यानंतरही रस्त्याची अवस्था कायम असते. 

तुमसर-मोहाडीत सर्वाधिक रस्ते नादुरुस्त- भंडारा जिल्ह्यातील सर्वाधिक नादुरुस्त रस्ते तुमसर आणि मोहाडी तालुक्यात आहेत. या तालुक्यात असलेल्या रेतीघाटावर जाणारे रस्ते खाचखडग्यांनी भरलेले आहेत. गावातून जाणाऱ्या राज्य आणि जिल्हा मार्गांची अवस्थाही दयनीय आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून वाहनांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यासोबतच अपघाताची मालिकाही कायम असते.

 

टॅग्स :RainपाऊसTrafficवाहतूक कोंडी