शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रेतीमुळे रस्ता बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:38 IST

डोंगरला-नवरगाव रस्त्यावर डम्पिंग केलेली रेती महसूल प्रशासनाने भूईसपाट केली. सध्या हा रस्ता ये-जा करण्यास धोकादायक ठरला आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे दुर्लक्ष : डोंगरला-नवरगाव रस्त्यावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : डोंगरला-नवरगाव रस्त्यावर डम्पिंग केलेली रेती महसूल प्रशासनाने भूईसपाट केली. सध्या हा रस्ता ये-जा करण्यास धोकादायक ठरला आहे. दुचाकी स्वारांना या रस्त्यावरून दुचाकी चालविणे शक्य नाही. महसूल प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. डोंगरला गावातही ठिकठिकाणी रेतीचे ढीग होते. महसूल प्रशासनाने ती रेतीही भुईसपाट केली होती. पुन्हा ती रेती अनेकांनी जमा करणे सुरू केले आहे.डोंगरला-नवरगाव रस्त्यावर सुमारे २०० ब्रास अवैध रेतीचा साठा केला होता. त्यावर महसूल प्रशासनाने कारवाईच्या नावावर संपूर्ण रेती रस्त्यावर भुईसपाट केली. या मार्गाने शेतकरी तथा इतर ग्रामस्थ ये-जा करतात. दुचाकीस्वारांना येथून दुचाकी चालविता येत नाही. रेतीमुळे रस्ता निसरडा झाला आहे. सध्या हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. यामुळे शेतकºयांत असंतोष आहे.डोगरला गावातही अवैध रेती साठा करून ठेवला होता. रस्त्यावर रेती भुईसपाट केल्यानंतर महसूल प्रशासनाने डोंगरला गावातील अवैध रेती साठा सुद्धा भुईसपाट केला. भुईसपाट केलेली रेती पुन्हा येथे जमा करणे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने केलेली कारवाई थातूरमातूर केली. महसूल प्रशासनाने नियमांचा आधार न घेता हास्यास्पद कारवाई कां केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकरणात महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही मूग गिळून गप्प आहेत. महसूल प्रशासनाला शासनाकडूनही आतापर्यंत कोणतीच विचारणा करण्यात आली नाही, असे समजते. रेती पंचनामा व जप्तीची कारवाई येथे कां करण्यात आली नाही हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. तुमसर तालुक्यात रेती घाट सुरक्षित नसून अवैध रेतीचा उपसा सर्रास सुरू आहे. येथे महसूल प्रशासनाच्या आशिर्वादामुळेच हा प्रकार सुरू आहे. महसूल प्रशासनाच्या जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देणार काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.