शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेचे नदीपात्र रेती तस्करांनी पोखरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

माडगी येथे नदीपात्रात गावाचे अंतर केवळ ५० ते ६० मीटर आहे. प्रचंड रेती उपशामुळे पुराचे पाणी नदीकाठावरील गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गतवर्षी पुरात नदीकाठावरील घरात पाणी शिरले होते. शास्त्रीयदृष्ट्या रेती ही पुराचे पाणी थोपविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. नदीपात्रातून रेती तस्कर रेतीचा उपसा करताना, महसूल प्रशासनाला दिसले नाही काय, असा प्रश्न उपस्थित होतो. माडगी या गावात तलाठी कार्यालय आहे, त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देमाडगी येथील प्रकार: महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह, प्रशासन कारवाई करणार काय?

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुका मुख्यालयापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर माडगी येथील वैनगंगा नदीपात्र रेती तस्करांनी अक्षरश: पोखरून टाकले आहे. उत्खनन केलेल्या रेतीचा स्मशानघाट परिसर व गावाच्या प्रवेशद्वाराजवळच साठा केला आहे. पोखरलेल्या नदीपात्रामुळे गावाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. तस्करांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.माडगी गावाशेजारी वैनगंगा नदी पात्र आहे. येथील नदी पात्र विस्तीर्ण असून, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दर्जेदार रेती होती, परंतु ही रेती तस्करांनी उत्खनन केली. सदर रेती घाटाचा महसूल शासनाने लिलाव केला नाही. त्यानंतरही रेती तस्करांनी नदीपात्रातून रेतीचा प्रचंड उपसा केला. त्यामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. सध्या नदीपात्रात रेती शिल्लक उरली नाही.माडगी येथे नदीपात्रात गावाचे अंतर केवळ ५० ते ६० मीटर आहे. प्रचंड रेती उपशामुळे पुराचे पाणी नदीकाठावरील गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गतवर्षी पुरात नदीकाठावरील घरात पाणी शिरले होते. शास्त्रीयदृष्ट्या रेती ही पुराचे पाणी थोपविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. नदीपात्रातून रेती तस्कर रेतीचा उपसा करताना, महसूल प्रशासनाला दिसले नाही काय, असा प्रश्न उपस्थित होतो. माडगी या गावात तलाठी कार्यालय आहे, त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रेतीचा उपसा करताना महसूल प्रशासनाची परवानगी घेतली होती काय, असा प्रश्न उपस्थित होत असून, घाट लिलाव नसताना राजरोस रेतीचा उपसा कसा केला, हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो. स्थानिक स्तरावर रेती उपसा करण्याची परवानगी येथे दिली गेली होती, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. रेतीचा उपसा करताना महसूल प्रशासनाची परवानगी घेतली होती काय, असा प्रश्न उपस्थित होत असून, घाट लिलाव नसताना राजरोस रेतीचा उपसा कसा केला, हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो. स्थानिक स्तरावर रेती उपसा करण्याची परवानगी येथे दिली गेली होती, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

पर्यावरणाला धोका- माडगी येथील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केल्यामुळे नदीपात्रात रेती नामशेष झाली आहे. सध्या नदीपात्रात तळातील माती दिसत आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. स्मशान शेडजवळ रेती साठा करून ठेवला आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरही रेती साठा आहे. रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

 

टॅग्स :riverनदीsandवाळू