शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

उमरवाडा वैनगंगेत गिळंकृत होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:42 IST

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायिनी वैनगंगा नदीकाठ एकेकाळी सुपीक जमिनीसाठी ओळखला जात होता. मागील ८ ते १० वर्षात उमरवाडा गावासह परिसरातील चार ते पाच गावाच्या दिशेने नदी पात्र झपाट्याने पुढे सरकत आहे. आतापर्यंत सुमारे ९२ हेक्टर सुपीक शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. शासन व प्रशासनाने वेळीच दखल घेतली ...

ठळक मुद्देउमरवाडा, बोरी, कोष्टी येथील ९२ हेक्टर शेती नदीपात्रात गेली

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायिनी वैनगंगा नदीकाठ एकेकाळी सुपीक जमिनीसाठी ओळखला जात होता. मागील ८ ते १० वर्षात उमरवाडा गावासह परिसरातील चार ते पाच गावाच्या दिशेने नदी पात्र झपाट्याने पुढे सरकत आहे. आतापर्यंत सुमारे ९२ हेक्टर सुपीक शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. शासन व प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर अख्खे गाव गिळंकृत होण्याची भिती आहे.भंडारा व गोंदिया जिल्ह्यांच्या सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. तुमसर तालुक्यातील उमरवाडा गावाजवळून वैनगंगेचे पात्र आहे. मागील ८ ते १० वर्षात उमरवाडा नदी काठावरील अनेक शेतकºयांच्या सुमारे ३० ते ३१ हेक्टर शेती नदी पात्रात गिळंकृत झाली आहे.उमराडासह, बोरी, कोष्टी येथील ९२ हेक्टर शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. अतिशय सुपिक शेती म्हणून या गावातील शेती ओळखली जाते. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आला तर शेती नदी पात्रात समाविष्ट होण्याचा क्रम सुरूच आहे. अनेक लहान मोठ्या शेतकºयांच्या शेती नदीने गिळंकृत केल्या आहेत.रोशन मेश्राम यांची उमरवाडा येथील नदीकाठावरील सुमारे ४.५० एकरशेती नदीपात्रात समाविष्ट झाली आहे. शासनाकडून आतापर्यंत कोणतीच दखल घेण्यात आली नाही. नदी पात्र दरवर्षी गावाच्या दिशेने सरकत असल्याने गावाला येथे धोका निर्माण झाला आहे.शासन दरबारी ४२ हेक्टर शेती नदी पात्रात समाविष्ट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. उमरवाडा व धाटकुरोडा येथील रेतीघाट शासनाने यापुर्वी लिलाव केले होते. बेसुमार रेती उपसा तिथे करण्यात आला. त्याचा फटका येथे बसल्याची माहिती आहे. सन २००२ व २००३ मध्ये येथे रेतीघाट लिलाव करण्यात आला होता.उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हणी येथील शेती नदी पात्रात गेल्याची माहिती शासनाला माजी आमदार अनिल बावणकर यांनी केली होती. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी सच्चिन्द्रप्रताप सिंग तथा तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमरवाडा,बोरी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. रेतीघाट लिलाव प्रक्रिया तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी येथे स्थगित केली होती. उमरवाडासह इतर नदी काठावरील १८ विहिरी नदीपात्रात समाविष्ट झाल्या आहेत हे विशेष.दुष्काळाचा फटकातुमसर तालुक्यात १९४८, १९४३ व १९४४ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. तुमसर शहराला कोष्टी पंपगृहातून पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे नदी पात्रात तात्पूरती पाण्याकरिता वळणमार्ग करण्यात आला होता. पावसाळ्यात या वळणमार्गाने पाण्याचा प्रवाह्य बदलल्याची माहिती वयोवृद्धांनी दिली. शेकडो नागरिकांनी तेव्हा लोकसहभागातून हा वळणमार्ग तयार केला होता.उमरवाडासह बोरी, कोष्टी व बाम्हणी गावाकडे नदी पात्र सरकत असून शेकडो एकर शेती नदीपात्रात जाणे सुरूच आहे. शासनाने दखल घेऊन उपाययोजना करावी.-रोशन मेश्राम, शेतकरी उमरवाडा.वैनगंगा नदीपात्र दिवसेंदिवस गावाकडे सरकत आहे. शेती गेलेल्या शेतकºयांनाम मोबदला शासनाने द्यावा. गावांचे संरक्षण करण्याच्या उपाययोजना शासनाने राबवावी. वैज्ञानिक उपाययोजना काय करता येईल याकरिता जिल्हाधिकाºयांनी शासनाला कळविण्याची गरज आहे.-के. के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य देव्हाडी.