शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर गोंदिया मार्गाला भूस्खलनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:03 IST

तुमसर रोड येथे ५३२ रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे कामे सुरू आहेत. पुल बांधकामाकरिता एक मोठा विहिरीसारखा खड्डा अपघाताला आमंत्रण देत आहे. मागील एक महिन्यांपासून काम बंद आहे. तुमसर गोंदिया राज्य मार्गाशेजारी खड्डा असून भूस्खलनाचा येथे धोका निर्माण झाला आहे. सुरक्षिततेअभावी वाहन धारकांना येथे धोक्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउड्डाण पूल बांधकामासाठी खोदला खड्डा : देव्हाडी रेल्वे फाटकाजवळील प्रकार

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर रोड येथे ५३२ रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे कामे सुरू आहेत. पुल बांधकामाकरिता एक मोठा विहिरीसारखा खड्डा अपघाताला आमंत्रण देत आहे. मागील एक महिन्यांपासून काम बंद आहे. तुमसर गोंदिया राज्य मार्गाशेजारी खड्डा असून भूस्खलनाचा येथे धोका निर्माण झाला आहे. सुरक्षिततेअभावी वाहन धारकांना येथे धोक्याची शक्यता आहे.तुमसर रोड येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. मुख्य कॉलमपर्यंत बांधकाम करण्याकरिता मोठा खड्डा तयार करण्यात आला. देव्हाडी गावात जाण्याकरिता रस्ता पाहिजे. याकरिता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामास विरोध केला. आधी रस्ता सोडा किंवा अंडरपास तयार करा, कायम रस्ता बंद करू देणार नाही, अशी भूमिका शिवसेना पदाधिकाºयांनी घेतल्यामुळे काम बंद करण्यात आले.एक महिन्यापासून काम बंद आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचले असून तलावाचे रुप खड्ड्याला आले. १० ते १२ फूट खोल खड्डा आहे. खड्ड्याला लागूनच तुमसर गोंदिया राज्य मार्ग आहे. खड्ड्याच्या काठावर जड वाहतूक करणारे ट्रक उभे राहतात. खड्ड्याला सुरक्षिततेचे कवच नाही. केवळ एका बाजूला सिमेंट दगड लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात भूस्खलन होऊन रस्ता खड्ड्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ५० ते ६० व ७० टनाचे ट्रक येथून दररोज ये जा करतात. नियोजनाचा अभाव येथे दिसून येतो. उड्डाणपुलाची कामेही कासवगतीने सुरु आहेत. राज्य शासन व रेल्वे विभागाचा संयुक्त उड्डाणपुल आहे. मागील चार वर्षापासून कामे सुरु आहेत. रेल्वेने कामाला काही दिवसापूर्वी सुरुवात केली. मोठी यंत्रे आणून ठेवली. यंत्राने व वाहनाने जागा व्यापली, परंतु कामे अजूनपर्यंत सुरु झाली नाही. एक दोन कामे वगळता कामे जैसे थेच आहेत.रेल्वे ट्रॅकवरील वीज खांब येथे सिमेंट खांबाला अडसर ठरत असल्याची माहिती आहे. तुमसर गोंदिया राज्य मार्गावरील खड्ड्याबाबत निर्णय घेण्याची येथे गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, मोहाडी व उड्डाणपुल बांधकाम विभागाने तात्काळ दखल न घेतल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.