शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना भुरळ घालणारा ऋषी मुनी आश्रम

By admin | Updated: January 15, 2015 22:47 IST

जिल्ह्याचे नाव काना कोपऱ्यात पोहचविण्याची क्षमता चांदपुरात आहे. राजकीय इच्छा शक्ती अभावी हे स्थळ उपेक्षित आहे. या गावात पर्यटकांना भुरळ घालणारा ऋषी मुनी आश्रम पुन्हा भर घालणार आहे.

घनदाट जंगलात गुफा : आकर्षणाचे केंद्र, राजकीय अनास्थेपोटी उपेक्षाचुल्हाड (सिहोरा) : जिल्ह्याचे नाव काना कोपऱ्यात पोहचविण्याची क्षमता चांदपुरात आहे. राजकीय इच्छा शक्ती अभावी हे स्थळ उपेक्षित आहे. या गावात पर्यटकांना भुरळ घालणारा ऋषी मुनी आश्रम पुन्हा भर घालणार आहे. या गाव परिसराला दत्तक घेण्याची आवश्यकता आहे.चांदपूर येथील सातपुडा पर्वत रांगाच्या उंच टेकडीवर असणाऱ्या जागृत हनुमान देवस्थानाने भाविकांच्या हृदयात श्रद्धास्थान निर्माण केले आहे. अनेक प्रांतातून भाविक हजेरी लावत आहेत. या देवस्थाने गावाचे नाव कानाकोपऱ्यात नेले आहे. भंडारा जिल्ह्याची राजकीय पातळीवर चर्चा होताना देवस्थानाचा नाव आवर्जून उल्लेख होत आहे. याच परिसराने पुन्हा ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचा विकास झाल्याने मानाचा तुरा रोवला आहे. भाविक आणि पर्यटकांची सांगड या परिसराने घातली आहे. पर्यटनस्थळाला उतरती ळा लागताच पर्यटकांची संख्या रोडावली आहे. यात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून आलेला आहे. पुन्हा पर्यटनस्थळ जीवंत ठेवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यात लगबग दिसून आलेली नाही. रोजगार हरविला आहे. निसर्गाने वैभव दिला असताना जिल्हा प्रशासनाला चिज करता आले नाही. याच परिसरात २ कि.मी. अंतरावर घनदाट जंगलात ऋषी मुनी आश्रम आहे. चांदपूरच्या इतिहासात या स्थळाला विकसित केल्यास आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या स्थळात साईबाबांचे गुफेत मंदिर आहे. नागदेवता चे देवस्थान गुफेतच आहे. या शिवाय कोटु बाबा आश्रम उंच टेकडीवर असून दगडाच्या गुफेत आहे. काही अंतरावर असलेला दुर्गा मातेचा मंदिर कोसळला आहे.घनदाट जंगल, लांब पल्ल्याचे अंतर तथा गुफा असल्याने भिती निर्माण होत आहे. या आश्रम परिसरात ३-४ जणांचा घोळका फेरफटका मारण्यासाठी जातो. अनेकांना हे स्थळ माहिती नाही. या स्थळाकडे जाणारा पक्का रस्ता नाही. दगडाची पायवाट आहे. यामुळे वाहनांची प्रवास करता येत नाही. पायदळ जावे लागत असल्याने टाळण्यात येत आहे. याच आवारात शुद्ध पाण्याचा झरा आहे. या झऱ्यात बारमाही पाणी राहतो. अनेक झरणे असले तरी एकच झरा आकर्षित करीत आहे. पावसाळ्यात जंगल हिरवे गार होत असल्याने कुणी या आवारात जात नाही. वन्यप्राणी तथा साप विंचवांची भिती निर्माण होत आहे. चांदपूर विकासात या कृती आराखड्यात या स्थळाचा समावेश केल्यास पर्यटकांना आकर्षण ठरणार आहे.या परिसरात चांद शॉ वलीची दरगाह आहे. या दरगाहकडे ये - जा करणारे रस्ते तयार करण्यात आली आहेत. परंतु आवारात बालोद्यान, बाग बगीचा अभाव आहे. नाविण्यविकास करण्याची गरज आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाचा विकास करताना पाणी टाकी परिसर, जागृत हनुमान देवस्थान, ऋषी मुनी आश्रम, दरगाह, विस्तीर्ण चांदपूर जलाशय, लंगडा हनुमान, जंगल व्याप्त रस्ते, हॅलीपॅडच्या राखीव जागेत लहान मुलांचा बालोद्यान आदींचा समावेश करण्याची गरज आहे. (वार्ताहर)