शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, बटाट्यावरच काही दिवस भागवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST

भाजीपाला महागला तर काही दिवस कडधान्य खाऊन काम चालवून घ्यावे असे नियोजन केले जात होते. मात्र आता कडधान्यांचे दरही आवाक्याबाहेर झाले असून त्यात भाजीपाला एवढा महागला आहे की, सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करताना घाम फुटत आहे.  विशेष म्हणजे, आता उन्हाळ्यात पालेभाज्या बाजारातून गायब होणार असल्याने त्यांचे दर चांगलेच भडकले असून त्यांच्यापासून सर्वसामान्य माणूस चार हात लांबच राहत आहे. मात्र अन्य भाज्याही वधारल्या असून त्यांचे दर ऐकताच ते घेण्याची हिम्मत सर्वसामान्यांची होत नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  वरण, भात, भाजी व पोळी ही जेवणाची क्रमावली असून दोनच्या वेळच्या जेवणात ताटात हे पदार्थ असलेला माणूस जगातला सर्वात सुखी माणूसच ठरणार. कारण, या दोन वेळच्या जेवणासाठी अवघ्या जगावर मानवजातीची धावपळ सुरू आहे. ताटातून यातील एक जरी पदार्थ चुकला तरी तो दिवस चांगला जात नाही. मात्र आजघडीला देशाला झपाटलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांना दोन वेळच्या जेवणासाठी धडपड करूनही ते कठीण होत चालले आहे. सर्वच वस्तूंचे दर भडकले असून किराणा माल असो की भाजीपाला त्यांचे भाव ऐकून धडकी भरू लागते.भाजीपाला महागला तर काही दिवस कडधान्य खाऊन काम चालवून घ्यावे असे नियोजन केले जात होते. मात्र आता कडधान्यांचे दरही आवाक्याबाहेर झाले असून त्यात भाजीपाला एवढा महागला आहे की, सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करताना घाम फुटत आहे. विशेष म्हणजे, आता उन्हाळ्यात पालेभाज्या बाजारातून गायब होणार असल्याने त्यांचे दर चांगलेच भडकले असून त्यांच्यापासून सर्वसामान्य माणूस चार हात लांबच राहत आहे. मात्र अन्य भाज्याही वधारल्या असून त्यांचे दर ऐकताच ते घेण्याची हिम्मत सर्वसामान्यांची होत नाही. यामुळेच आता भाजीपाल्याचे दर उतरत पर्यंत जेवणात कांदा-बटाटा किंवा टमाटरची चटणी याशिवाय पर्याय उरलेला नाही. परिणामी आता ताटातून भाजीपाला दिसेनासा झाला असून कांदा-बटाट्याची भाजी दिसून येत आहे. 

कोठेही जा हेच दर 

- भाजीपाला चांगलाच भडकला हे दर शहरांपुरतेच मर्यादित नसून कोठेही जा हेच दर दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातून येणारे कित्येक जण भाजीपाला शहरातील बाजारातून खरेदी करून नेतात. दरवाढीने गृहीणींचे अंदाजपत्रक बिघडले आहे.

 लिंबू ३०० रुपयांवर 

मध्यंतरी ६०-७० रूपये किलो वर असलेले लिंबू आता ३०० रूपये किलो दराने विकले जात आहे. काही दिवसांपूर्वीच असलेल्या नवरात्रीमध्येही नागरिकांना लिंबू मिळाले नाही अशी परिस्थिती आहे. दर भडकल्यामुळे आंबट लिंबू कडू झाला आहे..

भाव आणखी वाढणार

उन्हाळ्यात कित्येक भाज्यांचे उत्पादन होत नाही. शिवाय जो भाजीपाला येतो तो बहुतांश बाहेरून येतो. म्हणजेच, कमी उत्पादन व त्यात बाहेरून येत असल्याने लागणारे भाडे यामुळे भाजीपाल्याचे दर आणखी वाढणार यात शंका नाही.

 

टॅग्स :vegetableभाज्या