शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

भाताचे साकोली-९ वाण विकसित

By admin | Updated: June 22, 2017 00:30 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी संशोधन केंद्र साकोली येथून साकोली - ९ हे भाताचे नवीन वाण निर्माण करण्यात आले आहे.

कृषी संशोधन केंद्राचा उपक्रम : संयुक्त कृषी संशोधनाला मान्यताशिवशंकर बावनकुळे । लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली. : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी संशोधन केंद्र साकोली येथून साकोली - ९ हे भाताचे नवीन वाण निर्माण करण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे २९ ते ३१ मे ला झालेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीने सदर वाणास विदर्भ विभागातील ओलीताखालील क्षेत्रात खरीप हंगामात लागवडीसाठी शिफारस केली व मान्यता दिली आहे.साकोली-९ हा मध्यम कालावधीचा म्हणजे पेरणीपासून १३० ते १३५ दिवसात कापणीस तयार होतो. या वाणाचे दाणे मध्यम बारीक असून उत्पादन ३८-४० असून अनुवंशिक उत्पादन क्षमता ५५ क्वि हे पर्यंत आहे. सदर भात वाण हा पिकेव्ही एचएमटी आणि किशोर या जातीच्या संकरातून निर्माण केला असल्यामुळे खाण्यास उत्तम आहे. यामध्ये अमायलोज प्रमाण २२.५५ टक्के म्हणजे मध्यम असल्यामुळे भात मऊ व मोकळा होतो. या वाणाचे मिलिंगचे प्रमाण जास्त म्हणजे ६८ ते ७५.८६ टक्के पर्यंत आहे. दिवसेंदिवस पूर्व विदर्भ विभागामध्ये किडी व रोगाचे प्रमाण भात पिकावर वाढत असल्याचे दिसून येत आहे.सदर नवीन वाण खोडकीडीचा साधारण प्रतिकारक आहे. तसेच गादमाशीचा प्रादुर्भाव सुद्धा आरपी ४-१४ व पिकेव्ही एचएमटी पेक्षा कमी प्रमाणात होतो. याच बरोबर पानावरील करपा, मानमोडी पर्णकोष कुजल्या, टुंग्रो व तपकिरे ठिपके या रोगांना सुद्धा साधारण प्रतिकार करण्याची क्षमता इतर वाणापेक्षा जास्त असल्यामुळे दिवसेंदिवस फवारणीवर होणारा शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यास मदत होईल. या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध असून प्रती शेतकऱ्यांना ३५ किलो प्रमाणे बियाणे मिळेल. तरी शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड खरीप हंगामात करावी.-डॉ.जी.आर. श्यामकुंवर, वरिष्ठ भात पैदासकर तथा वाण संशोधक़