शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

ओबीसींनी काढला शहरातून क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:14 IST

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांची दखल न घेतल्यामुळे ओबीसी क्रांती मोर्च्याच्या वतीने बुधवारी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. यात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : ओबीसींची जनगणना करा, समस्यांचा वाचला पाढा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांची दखल न घेतल्यामुळे ओबीसी क्रांती मोर्च्याच्या वतीने बुधवारी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. यात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी क्रांतीमोर्चाचे संयोजक संजय मते, सुखराम देशकर, के. झेड. शेंडे आदींनी केले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे २ आॅगस्ट २०१८ रोजी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने मुक मोर्चा काढून ओबीसी समाजाच्या मुख्य मागण्यासंदर्भात प्रशासनाला अवगत करण्यात आले होते. परंतू शासनाने त्याची दखल घेतली नाही. शासनाला जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या पावलावर पावले ठेवून ओबीसी समाज तिव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला.ओबीसींची जनगणना करण्यात यावी, घरकुल देण्यात यावे, शेतकऱ्यांना मोफत विज पुरवठा करण्यात यावा, आरक्षणांतर्गत अन्य प्रवर्गाप्रमाणे शिष्यवृत्तीमध्ये सवलत लागू करण्यात यावी, ओबीसींना आरक्षण टक्केवारीनुसार देण्यात यावे, सर्व जातीला क्रिमीलीअरची अट रद्द करण्यात यावी, शासकीय रिक्त पदे भरण्यात यावी, विद्यार्थिनींप्रमाणे विद्यार्थ्यांनाही मोफत एसटीप्रवास पास देण्यात यावी, टीसी व जन्मप्रमाणपत्र हेच जातीचे प्रमाणपत्र मानण्यात यावे, जात पडताळणीचा गोरखधंदा बंद करण्यात यावा, परिक्षाशुल्क रद्द करावी, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सर्व विद्यार्थीनींना लागु करण्यात यावी, गणवेश भत्ता सर्व विद्यार्थ्यांना देण्यात यावा, ओबीसी मागासवर्गीयच असल्यामुळे अट्रासिटीचे गुन्हे दाखल करणे बंद करावे आदी मागण्यांचा समावेश आहे. जलाराम चौक येथून निघालेला हा मोर्चा गांधी चौक मार्गे शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेल्या पुढाºयांनी व अन्य वक्त्यांनी भाषणे दिली. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. याप्रसंगी संजय मते, सुखराम देशकर, के. झेड. शेंडे, अ‍ॅड. एस. व्ही. हलमारे, कुंदा वैद्य, उमेश मोहतुरे, बालु ठवकर, महेश जगनाडे, नेहाल भुरे, पुरुषोत्तम नंदुरकर, मधुकर भोपे, अश्विनी नंदुरकर, ज्योती नंदुरकर, अक्षय झंझाड, पंकेश काळे, नलिनी काळे, मुरलीधर भर्रे, सुभाष शेंडे, एस. डब्ल्यू. ठवकर, एन.टी. फुंडे, भुपेंद्र निर्वाण, कुंजबिहारी नेरकर, संजय बांते, आर. एन. मेहर, यशवंत भोयर, सुभाष आजबले, निखिल चवळे आदी उपस्थित होते.