शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

-तर पोटनिवडणुकीवर होणार परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:35 IST

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर भाजपने राज्यात सत्ता मिळविली. आता मात्र या मुद्याकडे दुर्लक्ष करून विदर्भवासीयांची दिशाभूल करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआशिष देशमुख यांचा इशारा : विदर्भ आत्मबळ यात्रा भंडाऱ्यांतून रवाना

आॅनलाईन लोकमतभंडारा : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर भाजपने राज्यात सत्ता मिळविली. आता मात्र या मुद्याकडे दुर्लक्ष करून विदर्भवासीयांची दिशाभूल करण्यात येत आहे. याचे परिणाम पुढे होणाºया भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक व त्यानंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत दिसून येतील. असा ईशाराच भाजपचे आमदार डॉ.आशिष देखमुख यांनी दिला.विदर्भ आत्मबळ यात्रा शुक्रवारला भंडाऱ्यात आली असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दुर्वास धार्मिक, अ‍ॅड.पद्माकर टेंभुर्णीकर, संजय मते उपस्थित होते. यावेळी आ.देशमुख म्हणाले, भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. गोसेखुर्द व बावनथडीसारखे मोठे सिंचन प्रकल्प असूनसुद्धा येथे सिंचनाचा प्रश्न आहे. नहरांची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत. सिंचनासाठी अधिग्रहित जमिनीचा मोबदला शेतकºयांना मिळाला नाही. माजी मालगुजारी तलाव असले तरी दुरूस्ती व गाळामुळे सिंचन क्षमता कमी झाली आहे.भंडारा जिल्ह्यात धान व सोयाबीन प्रमुख पिके आहेत. दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. कर्जबाजारी शेतकºयांचा कुणी वाली नाही. एमआयडीसीमधील बरेचसे प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भाजपने लहान राज्यांच्या निर्मितीचे समर्थनच केले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ जनमत जाणून घेण्याच्या उद्देशाने विदर्भात अमरावती, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ येथे सार्वजनिक मतदान घेण्यात आले. ९५ टक्के जनतेने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ मतदान केले होते. सर्वांगिण विकासासाठी विदर्भातील जनतेला स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘सत्तेत आल्यास वेगळे विदर्भ राज्य निर्माण करू’ असे असे जाहिरनाम्यात म्हटले होते. त्यामुळे विदर्भातील ४४ जागा भाजपने जिंकून सत्तेवर आली. परंतु आता विसर पडला आहे.