शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेस्टारेंट अँड बार संघटनेचा वाढीव कर धोरणावर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:47 IST

बार, परमिट रूम बंद : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्रातील बार आणि परमिट रूम धारकांनी सरकारच्या वाढीव कर धोरणाविरोधात सोमवारी एकदिवसीय बंद पुकारला. या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिणामी, मद्यपींचा हिरमोड झाला असून, अनेकांचे रोजगार धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. यासंदर्भात जिल्हा रेस्टारेंट अॅण्ड बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन व महाराष्ट्र रेस्टॉरंट परमिट रूम संघटनांच्या नेतृत्वाखाली हा बंद आयोजित करण्यात आला. सरकारने दारूवरील व्हॅट दुप्पट केला आहे. तसेच, लायसन्स फीमध्ये १५ टक्के आणि उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ केली आहे. या तिहेरी करवाढीमुळे बार आणि परमिट रूम व्यवसायावर मोठा आर्थिक भार पडला आहे. लहान व मध्यम दर्जाच्या हॉटेल्स, बारच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे, असे संघटनांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील बार, परमिट रूम दिवसभर बंद ठेवण्यात आले. ग्राहकांना मद्य मिळवणे शक्य झाले नाही, त्यामुळे अनेक मद्यपी नाराज झाले. आज दिवसभर रेस्टारेंट व बार यांनी बंद पाळून आंदोलनात सहभाग घेतला. 

यांची होती उपस्थितीजिल्हा रेस्टारेंट अॅण्ड बार असोसिएशनचे अध्यक्ष महेश सपाटे, सचिव संजीव कम्बोज, लाखनी तालुका अध्यक्ष राजेश निंबेकर, सचिव शेषराव वंजारी, तसेच उमाकांत कोटांगले, श्रीकांत डोरले, अविनाश थोटे यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास ७० बार व परमिट मालक उपस्थित होते.

संघटनांचा सरकारला इशाराकरवाढ सुरूच राहिल्यास भविष्यात अनेक बार, परमिट रूम कायमस्वरूपी बंद पडतील. त्यामुळे हजारो कामगार बेरोजगार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागानेही बार व परमिट रूमसाठी नवे नियम लागू केले आहेत. २५ वर्षाखालील तरुणांना मद्य विक्रीस बंदी, दोन महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याची सक्ती, तसेच बार सुरू ठेवण्याच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. या सर्व धोरणांचा एकत्रित परिणाम म्हणून व्यवसायिकांमध्ये मोठा असंतोष आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा