शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ग्रामविकासाची जबाबदारी सरपंचांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:02 IST

ग्रामविकासाची धुरा सरपंचावर असून गावाचा विकास साधताना त्यांनी पंचसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. जल, जन, जंगल, जमीन आणि जनावर यावर लक्ष केंद्रीत केल्यास गावाचा पायाभूत विकास साधता येतो.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी सुहास दिवसे : लोकमतच्या गौरवाने सरपंच भारावले, भरगच्च उपस्थितीत पार पडला नेत्रदीपक सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामविकासाची धुरा सरपंचावर असून गावाचा विकास साधताना त्यांनी पंचसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. जल, जन, जंगल, जमीन आणि जनावर यावर लक्ष केंद्रीत केल्यास गावाचा पायाभूत विकास साधता येतो. कोणतेही काम करताना राजकारण न करता सर्वांना समान न्याय देण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.यावेळी ते म्हणाले, ६४ व्या घटना दुरूस्तीनंतर सरपंचांना महत्त्व प्राप्त झाले आहे. आता थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना गाव विकासासाठी संधी आहे. थेट निवडून आल्याने गावविकासाची जबाबदारी त्यांच्यावर असून पर्यावरणासह शेती व अन्य पुरक व्यवसायावर लक्ष केंद्रीत करून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून द्यावे. सरपंचाच्या सुजान नेतृत्वातून गावाची विकासाकडे वाटचाल होईल. सर्वांनी निरपेक्ष वृत्तीतून कार्य करावे, भविष्यात भंडारा जिल्ह्यात जलसंकट निर्माण होण्याची भिती आहे. हे टाळण्यासाठी जलपुर्नभरणावर सर्व सरपंचानी लोकसहभागातून ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ यावर काम करावे यातूनच गावाचा विकास साधता येईल. आरोग्य, शिक्षणासोबतच सर्व सरपंचानी कुपोषणावर भरीव काम करावे, जिल्हा परिषद शाळांची गळती थांबविण्याकरिता सर्व सरपंचासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पाल्य जिल्हा परिषद शाळेत दाखल करून शाळेचा दर्जा सुधारण्याकरिता सहकार्य करावे. पुरस्कारामुळे सर्वांची जबाबदारी वाढली असून कुठल्याही गोष्टीत प्रशिक्षणाची गरज भासल्यास थेट प्रशासनाशी संपर्क साधल्यास प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाहीसुद्धा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी यावेळी दिली.कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जि.प. शिक्षण व अर्थ सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बालविकास सभापती रेखा ठाकरे, सेवानिवृत्त अधिक्षक आनंदराव चरडे, देवचंद ठाकरे, प्रमोद गभणे, चेतन भैरम, नगर पालिका उपाध्यक्ष रुबी चढ्ढा, नगरसेवक संजय कुंभलकर, नगरसेवक आशु गोंडाणे, नगरसेवक नितीन धकाते, भाजप महासचिव प्रशांत खोब्रागडे, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे, नगरसेवक चंद्रशेखर रोकडे, शिक्षक नेते मुबारक सैय्यद, महेश गावंडे, राजेश येरणे, बबन येरणे, हेमंत बांडेबुचे, अजय गडकरी, युवक काँग्रेसचे मुकूंदा साखरकर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी लोकमतचे भंडारा शाखा व्यवस्थापक मोहन धवड, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी, शशिकुमार वर्मा, लोकमत प्रतिनिधी इंद्रपाल कटकवार, शहर प्रतिनिधी प्रशांत देसाई, जाहिरात प्रतिनिधी विनोद भगत, बालविकास मंचचे जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे, श्रध्दा डोंगरे, मनिषा रक्षीये, चित्रा झुरमुरे, कल्पना डांगरे, सुहासिनी अल्लडवार, मंगला क्षीरसागर, प्रिती मुळेवार, जयश्री तोडकर, अंजली वंजारी, सायली तोडकर, कल्पना शेट्टी आदींनी सहकार्य केले.सरपंचच ग्राम विकासाचा कणाप्रत्येक गाव स्वच्छ व सुंदर असायला हवे. यातून गाव विकासाची दिशा ठरणार आहे. गाव सुंदर असेल तर विकासाचे वातावरण निर्माण होईल. नागरिकांच्या जिवनमानात बदल करता येईल. शाश्वत स्वच्छता हा महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर जिल्हाभरातील गावे मोठया प्रमाणात स्वच्छतेचा स्वीकार करीत पुढाकार घेत आहेत. त्यामुळे गावात शाश्वत स्वच्छता करण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्य होण्याची गरज आहे. सरपंच हा गावाचा प्रमुख आहे. आता थेट लोकांमधून त्याची निवड केली जाते. त्यामुळे लोकांना संघटीत करून गाव विकासाला चालना देण्यासाठी सरपंचांची भूमिका महत्वाची राहणार आहे. गावातील सगळया कार्यात सर्वात प्रथम स्वच्छतेवर कार्य करण्यासाठी एकजूट होण्याची गरज आहे.- मनोजकुमार सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.भंडारा.जिल्ह्याचा नावलौकीक वाढवाजिल्ह्यात नैसर्गिक स्त्रोत कमी आहेत तरीसुद्धा हा जिल्हा सर्वच क्षेत्रात अव्वल आहे. यात पोलीस विभागही मागे नाही, फिरते पोलीस पथक हा उपक्रम राज्यात मॉडेल म्हणून राबविणे सुरू आहे. सरपंचांनी गावाचा लौकीक वाढवून जिल्ह्याचा नावलौकीक वाढवावा. फिरते पोलीस पथक, मोबाईल पथक ही संकल्पना सर्वप्रथम भंडारा जिल्ह्यात राबविण्यात आली. हा उपक्रम राज्यात राबविणे सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सरपंचानी गाव विकासाच्या नवीन उपक्रम राबवून विकासाचा पॅटर्न तयार करा.- विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडाराप्रेरणा देणारा पुरस्कारपुरस्कार हा आपल्याला प्रेरणाही देतो आणि जबाबदारीची जाणीवही करून देतो. त्यामुळे ‘लोकमत’च्यावतीने वितरीत होणाºया विविध पुरस्काराने ही जबाबदारी वाढली आहे. वाढत्या जबाबदारीतून नविन कार्याला चालना देण्याची गरज आहे. गावाला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शाश्वत स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. गावात सरपंचांनी स्थानिक स्तरावर लोकसहभागातून पुढाकार घेतला तर शाश्वत स्वच्छता राखता येईल, यासाठी सरपंचांनी शाश्वत स्वच्छतेकरिता पुढाकार घ्यावा. गावागावातील सरपंचांनी शासनाच्या योजनांचा आपल्या गावासाठी उपयोग करावा.- डॉ.परिणय फुके, आमदार, भंडारा-गोंदिया.ऊर्जावान सत्कार सोहळालोकमतने घेतलेल्या या पुढाकाराने तळागाळातील सरपंचाकरिता हा पुरस्कार सोहळा ऊर्जा निर्माण करणारा आहे. प्रशासनाची जबाबदारी लोकमत वृत्तपत्राने घेऊन सरपंचाच्या माध्यमातून गाव विकासाचे उद्दीष्ट अशी सांगड घालणारा हा कार्यक्रम आहे. सर्व सरपंच व पदाधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना देवून गाव विकास साधावा.- रमेश डोंगरे, अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा.सरपंच गावाचा न्यायाधीशशासनाच्या सर्व योजना ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत आहेत. ग्रामविकासाच्या व वैयक्तिक लाभाच्या सर्व योजना सरपंचांनी पुढाकार घेऊन राबविण्याची गरज आहे. सरपंच गावातील न्यायाधीश असतो, त्यांनी पक्षपात न करता गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून सरपंचांनी नागरिकांना सेवा दिली पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करतांना गरजूंना लाभ द्यावा.- अ‍ॅड रामचंद्र अवसरे, आमदार भंडारातंत्रज्ञानातून शेतीचा विकास कराधान उत्पादक भंडारा जिल्ह्यात ८५ टक्के नागरिक शेती व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी शासनाने अनेक योजनांची अंमलबजावणी केली असून जिल्हाधिकारी दिवसे यांच्या माध्यमातून जिल्हा प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बचतगटांच्या महिलांनी प्रगतीसाठी एकत्र येण्याची गरज आहे. बीपीएल धारकांनी सबसीडीचा लाभ घेऊन विकास साधावा आणि तंत्रज्ञानातून शेतीचा विकास करावा.- प्रकाश राहांगडाले, महिंद्रा ट्रॅक्टर डिलर भंडारा.लोकमतने कार्याची दखल घेऊन केलेला हा सन्मान प्रेरणादायी आहे. पुरस्कारामुळे काम करण्याची सर्वांमध्ये चुरस निर्माण होईल. परिणामी शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना देण्यात सर्व पुढाकार घेतील.- माया कुथे, सरपंच शिवनीग्रामीण विकासाचा कणा असलेल्या सरपंचाचा हा सन्मान प्रोत्साहन देणार आहे. सन्मानाने जबाबदारी वाढली असून सर्वांना समाज कार्य देण्यासाठी प्रयत्न करु.- शारदा गायधने, सरपंच बेलालोकमतने कार्याची दखल घेऊन सत्कार केल्याने उर्जा प्राप्त झाली. पुन्हा नव्या दमाने गाव विकासाकरिता प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. लोकचळवळीचे काम लोकमत वृत्तपत्राने केले आहे.- गजानन लांजेवार, सरपंच, सितेपार (तुमसर)लोकमतच्या सत्काराने मी भारावुन गेलो. गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याचा मोठ्या व्यासपीठावर लोकमतने माझा सत्कार केला. जिल्ह्यात गावाचा लौकीक वाढला. पुन्हा लोकसहभागातून गावाचा कायापालट करणार आहे.- भाऊलाल बांडेबुचे, सरपंच सुकळी (दे)अवार्ड कतृत्वाचा असला तरी माझ्या पुढील कामाला प्रेरणादायी ठरणार आहे. नव्या उमेदिने तरुण सरपंच गाव घडवतील. नवीन उर्मी देणारा कार्यक्रम होता.- दिनेश खंडाते, माजी सरपंच पालडोंगरीजोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळणार. सरपंच अवार्ड मिळाल्याने या कार्यक्रमातून अधिक जबाबदारीची जाणीव झाली. प्रथमच लोकमतने गावस्तरावरील सरपंचाचा सन्मान केला हे उल्लेखनीय आहे.- दिवाकर बोरकर, सरपंच जाब

टॅग्स :sarpanchसरपंच