शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

पडित जमीन सर्व्हेक्षणासाठी घेतला ठराव

By admin | Updated: September 17, 2016 00:59 IST

करडी, मुंढरी जि. प. क्षेत्रात अपुऱ्या पावसाने रोवणी रखडून हजारो एकर जमीन पडित राहिल्याच औचित्याचा मुद्दा

करडी (पालोरा) : करडी, मुंढरी जि. प. क्षेत्रात अपुऱ्या पावसाने रोवणी रखडून हजारो एकर जमीन पडित राहिल्याच औचित्याचा मुद्दा मोहाडी पंचायत समितीच्या बैठकीत १५ सप्टेंबर रोजी पं.स. सदस्य महादेव बुरडे यांनी मांडला. त्यावर चर्चा करुन शासनाने सर्व्हेक्षणाचे आदेश देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.खरिप हंगाम आॅगस्ट २०१६ पर्यंत करडी, मुंढरी परिसरात ५० टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाला. पऱ्हे दिड महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे झाले असतांना रोवणीलायक पाऊस पडला नाही. परिणामी शेतकऱ्यांना रोवणी करता आली नाही. शेतबोळ्या, शेततळे व लहान-मोठ्या तलावात, नाल्यात पाण्याचा ठणठणाट होता. जिल्हा कृषी अधिक्षक नलिनी भोयर यांचे सुचनेनुसार उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे यांच्या करडी परिसरातील पाहणीत हे सत्य दिसून आले. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याला रोवणी करता आली नाही. शासन प्रशासनाला सदर बाब माहित असतांनाही अजुनही रोवणी अभावी पडित राहिलेल्या शेतजमिनीच्या सर्व्हेक्षणाचे आदेश यंत्रणांना देण्यात आलेले नाहीत. शेतकरी मागील वर्षाप्रमाणे संकटात सापडला असतांना त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याचा डाव लोकप्रतिनिधींकडून जाणीवपूर्वक खेळाला जात आहे. शासनाने सक्तीने पिक विमा काढून घेतला. आता नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे व त्यांना पिक विमा नुकसान भरपाईस पात्र ठरविण्यास चौकशीचे आदेश देण्याचे काम शासनाचे नाही काय? प्रकरणी पं.स. सदस्य महादेव बुरडे यांनी अत्यंत अभ्यासपुर्ण माहिती मोहाडी पं.स. च्या बैठकीत मांडली. त्यावर सविस्तर चर्चा होवून शासनाने सर्व्हेक्षणाचा आदेश देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. (वार्ताहर)