शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

अत्याचाराचा एकजुटीने प्रतिकार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:38 IST

महिलांनी समाज-समाजात पंच म्हणून वावरताना जवळ असलेली ज्ञानाचा शिदोरी योग्यरीतीने हाताळून जनजागृती करावी.

ठळक मुद्देठाणा येथे महिला मेळावा : रत्नमाला वैद्य यांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : महिलांनी समाज-समाजात पंच म्हणून वावरताना जवळ असलेली ज्ञानाचा शिदोरी योग्यरीतीने हाताळून जनजागृती करावी. हे करीत असताना भेदाभेद करण्यास तिलांजली व्हावी. महिला उन्नतीसाठी असलेली आयुधे विविध माध्यमामधून हस्तगत करून अन्याय अत्याचाराविरूद्ध एकजुटीने प्रतिकार करावा, तरच महिला तरूणाईचा विकास संभव होऊ शकतो, असे प्रतिपादन रत्नमाला वैद्य यांनी केले.ठाणा पेट्रोलपंप येथे महिला राजसत्ता आंदोलन समिती फलकाचे अनावरण प्रसंगी महिला मेळाव्या विभागीय समन्वयक रत्नमाला वैद्य बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा संघटिका शालु तिरपुडे या होत्या. यावेळी बेला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शारदा गायधने, तालुका संघटीका रिता सुखदेवे, पंचायत समिती विस्तार अधिकारी अतुलकुमार वर्मा, विदर्भ कोकण ग्रामीण बँक व्यवस्थापक जोशी, माजी सरपंच कल्पना निमकर, सरपंच सुषमा पवार, शशीकांत भोयर ग्रामपंचायत ठाणाचे सर्व सदस्य उपस्थित होते.माजी सरपंच शारदा गायधने म्हणाल्या की गावातील महिलांनी ग्रामपंचायतच्या सर्व ग्रामसभामध्ये आवर्जून उपस्थित राहुन आपल्या अधिकार व कर्तव्याची जाणीव करून घ्यावी. त्यानुसार महिला वर्गाचा किंबहूना गावाचा चौमुखी विकास करावा.विस्तार अधिकारी वर्मा म्हणाले की, महिला बचत गटाद्वारे अधिकाधिक कृटीर उद्योग उभारून स्वालंबी बनावे. याकरिता कार्यक्षम महिला उद्योजक बनने काळाची गरज आहे. अध्यक्षीय भाषणात जिल्हा संघटिका शालु तिरपुडे म्हणाल्या की, तरूण युवतीला दैनिक शालेय जिवनापासून ते संसारीक जिवनापर्यंत जीवन जगत असताना विविध प्रसंगाला तोंड द्यावे लागतो.याकरिता त्यांना शालेय स्तरावर योग्य मार्गदर्शन देणे त्यांना पुढील आयुष्यात लढा देण्यासाठी सक्षम बनविणे ही आजच्या घडीला महत्वाची बाब झालेली आहे. प्रास्ताविक उमरीचे सरपंच आरती रंगारी यांनी केले. संचालन आशा शेंडे यांनी केले. आभार कुंदलता उके यांनी मानले. यशस्वितेसाठी महिला राजसत्ता आंदोलन समितीचे ठाणाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले.