शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राखीव वनपरिक्षेत्रात वनरक्षकावर हल्ला

By admin | Updated: May 11, 2016 00:47 IST

राखीव वनपरिक्षेत्रात पर्यटन व पार्टी करण्यावर बंदी असताना काही व्यक्तींनी मद्यप्राशन करून हौदोस घातला.

सहा दारुड्यांना अटक : ऐवजसह रोकड लांबविलीभंडारा : राखीव वनपरिक्षेत्रात पर्यटन व पार्टी करण्यावर बंदी असताना काही व्यक्तींनी मद्यप्राशन करून हौदोस घातला. ही बाब लक्षात येताच हटकणाऱ्या वनरक्षकाला मद्यधुंद व्यक्तींनी हल्ला करून जबर मारहाण केली. ऐवढ्यावर ते न थांबता त्यांच्याजवळील मोबाईल, सोन्याची चैन व रोख रक्कम लांबविली. ही घटना नागझिरा वन्यजीव अभयारण्यांतर्गत येणाऱ्या खुर्शीपार (कोका) जंगल शिवारात शुक्रवारला घडली.संजय रामदास अंबुले (२७) असे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून अन्य दोन फरार आहेत. अटक केलेल्यांमध्ये विरेंद्र उर्फ कल्लू लिखिराम दमाहे (३१), संतोष विजय लिल्हारे (३१), सुखराम चैतराम मोहारे (४९), सचिन उकराम ठवकर (२८), राजकुमार हरी बिरनवारे (४२) सर्व रा. देव्हाडी, अमित वसंत भवसागर (२३) रा. गांधी वॉर्ड तुमसर यांचा समावेश आहे. नागझिरा वन्यजीव अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या साकोली उप वनपरिक्षेत्रातील खुर्शीपार (कोका) हे राखीव वन परिक्षेत्रात येत असल्याने येथे प्रवेश बंदी आहे. वनविभागाचा नियम धाब्यावर बसून आठ व्यक्तींनी बफर झोन मार्गाने एमएच २८ व्ही ३८९२ क्रमांकाची चारचाकी वाहनासह राखीव वनक्षेत्रात प्रवेश केला. यानंतर आठही जणांनी राखीव वनक्षेत्रातील रस्त्यालगत मद्यप्राशन करून अक्षरश: हौदोस घातला. राखीव वनपरिक्षेत्रात गाडी खाली उतरण्यावर बंदी आहे. सोबतच पर्यटनासाठी जाताना वनविभागाची परवानगी लागते मात्र हे नियम भंग करुन त्यांनी जंगलात प्रवेश केला होता.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय अंबुले हे एका वन मजूरासह दुपारी कर्तव्यावर होते. राखीव वनपरिक्षेत्रात प्रवेश बंदी असतानाही मद्यप्राशन करणाऱ्यांना त्यांनी वनविभागाचे नियमभंग करणाऱ्या हटकले. यावरून आठही जणांनी अंबुले यांना शिवीगाळ करून मारहाण केली. सोबतच त्यांच्याजवळील मोबाईल, सोन्याची चैन व रोख ५,५०० रूपये हिसकाविला. या मारहाणीत अंबुले जखमी झाले. वनमजूराच्या मदतीने त्यांनी कशीबशी सुटका करून अभयारण्याच्या वरिष्ठांना घटनेची माहिती दिली.याप्रकरणी लाखनी पोलिसांनी संजय अंबुले यांच्या तक्रारीवरून कलम ३९७, ३५३, ३३२ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला व सहा जणांना अटक केली. यातील अन्य दोन जण फरार आहे. अटकेतील सहाही जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांची बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चाकाटे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)