शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण जाहीर

By admin | Updated: July 6, 2015 00:32 IST

जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या ७ सभापती पदाकरीता आज,रविवारी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सर्वांसमक्ष सोडत काढली.

तुमसर,पवनी, मोहाडी सर्वसाधारण प्रर्वगासाठी राखीवसाकोलीत अनुसूचित जाती, तर लाखनीत अनुसूचित जमातीसाठी राखीवभंडारा : जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या ७ सभापती पदाकरीता आज,रविवारी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सर्वांसमक्ष सोडत काढली. यामध्ये साकोली अनुसूचित जातीसाठी तर लाखनी अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव करण्यात आले. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग भंडारा आणि लाखांदूर महिला, सर्वसाधारण प्रवर्गात तुमसर, पवनी आणि मोहाडी हे क्षेत्र असून त्यापैकी तुमसर आणि पवनी हे महिलांसाठी राखीव आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती तसेच पंचायत समिती सभापती अधिनियम १९६२ च्या कलम २ (इ) प्रमाणे पंचायत समिती पदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. शासनाने १६ डिसेंबर २०१३ रोजी एका अधिसूचनेप्रमाणे सर्व जिल्ह्यांसाठी आरक्षण जाहिर केले होते. त्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसूचित जाती-१, अनुसूचित जमाती-१ (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दोन त्यापैकी १ महिला, तसेच सवर्साधारण प्रवर्गामध्ये तीन त्यापैकी २ महिला या प्रमाणे आरक्षण काढण्यात आले होते. जिल्ह्यातील पंचायत सभापती पदाकरीता सद्यस्थितीत लागू असलेले आरक्षण १२ जूलै २०१५ रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे लगेच येणाऱ्या दिवसापासून अडीच वर्षाच्या कालावधीकरीता आज जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी ७ सभापती पदासाठी आरक्षण जाहिर केले. ज्या पंचायत समिती क्षेत्रात अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे, ते क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात येते. त्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ९३२ एवढ्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येपैकी भंडारा २१.४१ टक्के, पवनी २१.१० टक्के, लाखांदूर १८.१७ टक्के, लाखनी १८.६० टक्के, साकोली १७.८४ टक्के, तुमसर १०.३५ टक्के, मोहाडी १०.३२ टक्के अशी लोकसंख्येचे प्रमाण आहे. मात्र यापूर्वी भंडारा, पवनी, लाखांदूर आणि लाखनी या क्षेत्रामध्ये आरक्षण देण्यात आले होते. त्यामुळे ते क्षेत्र वगळून उर्वरित साकोली, मोहाडी व तुमसर यापैकी जास्त लोकसंख्या असलेले साकोली क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.अनुसूचित जमातीसाठी सुध्दा जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्राला आरक्षण देण्यात येते. भंडारा जिल्ह्यात एकूण ९ लाख ९३ हजार २०६ लोकसंख्येपैकी ७८ हजार ४८३ एवढी लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे. त्यापैकी तुमसर १३.२८ टक्के, साकोली ११.२२ टक्के, पवनी ७.३ टक्के, लाखनी ६.७१ टक्के, भंडारा ५.८३ टक्के, लाखांदूर ५.१८ टक्के, तर मोहाडी ४.८६ टक्के असे लोकसंख्येचे प्रमाण आहे. यामध्ये पुर्वी तुमसर, साकोली, पवनी आणि मोहाडी या क्षेत्राला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले होते. त्यामुळे हे क्षेत्र वगळून उर्वरित लाखनी, भंडारा व लाखांदूर यापैकी सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या लाखनी क्षेत्राला अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत किशिका गोखले या चिमुकलीच्या हाताने चिठ्ठी टाकून काढण्यात आली. यामध्ये भंडारा (सर्वसाधारण) तर लाखांदूर महिलासाठी सोडत काढण्यात निघाली. त्याच प्रमाणे सर्वसाधारण प्रर्वगासाठी तुमसर, पवनी, मोहाडी हे क्षेत्र असून त्यापैकी तुमसर व पवनी महिलांसाठी आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी (महसूल) सुजाता गंधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)