सतीश सहस्त्रबुध्दे : १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतभंडारा : राज्यातील रद्द व व्यपगत झालेल्या आॅटोरिक्षा परवान्याच्या नुतनीकरणासंदर्भात शासनाने २३ आॅक्टोंबरला निर्णय घेतला. परवाना नुतनीकरणासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा लाभ आॅटोरिक्षा धारकांनी घ्यावा, असे आवाहन अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुध्दे यांनी केले. ते भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.ते म्हणाले, आॅटोरिक्षा धारकांनी परवान्याचे नुतनीकरण केले नाही. त्यामुळे अनेकांचे परवाने रद्द झाले आहेत. ३० आॅक्टोंबरपर्यंत परवाना नुतनीकरणाची मोहिम सुरु होती. परवाना नुतनीकरणाची मुदत वाढ १६ पर्यंत करण्यात आली आहे. परवाना नुतनीकरण न केल्यास त्यांचे परवाने कायमचे रद्द होणार आहेत. ज्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोडल आॅफीसर म्हणून नियुक्ती केली आहे. सदर अधिकाऱ्यांना वाटप केलेल्या विभागातील वायू वेग पथक, कार्यालय व सिमा तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांच्या मदतीने धडक तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेत पोलीस विभाग व एसटी महामंडळाची मदत घेतली जाणार असल्याचेही सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करा
By admin | Updated: November 4, 2015 00:35 IST