शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

वैयक्तिक स्वच्छता ठेवून आजाराला दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:28 IST

प्रत्येक कुटूंब निरोगी जीवन जगायला हवे. कुटुूंबातील बालकांपासून तर ज्येष्ठांपर्यंतचे आरोग्य सुदृढ असायला हवे. तरच कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो. याकरिता प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता पाळून आजाराला हद्दपार करायला हवे,.......

ठळक मुद्देरमेश डोंगरे यांचे प्रतिपादन : सोनी येथे आरोग्य शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रत्येक कुटूंब निरोगी जीवन जगायला हवे. कुटुूंबातील बालकांपासून तर ज्येष्ठांपर्यंतचे आरोग्य सुदृढ असायला हवे. तरच कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो. याकरिता प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता पाळून आजाराला हद्दपार करायला हवे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले. लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे आयुर्वेदिक दवाखान्यात पार पडलेल्या आरोग्य शिबिराप्रसंगी ते बोलत होते. तालुका आरोग्य विभागाचे वतीने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांची तर उदघाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, पंचायत समिती सभापती मंगलाताई बगमारे, गट विकास अधिकारी देविदास देवरे, पंचायत समिती सदस्य श्री ठाकरे, सरपचं सौ. कल्पना खंडाते, उपसरपंच हरीचंद्र धोटे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अविनाश कुथे, डॉ. निखील डोकरीमारे,डॉ. अनुजा बागडे, डॉ.जया थोटे, डॉ. मुंडले,नेत्र चिकित्सक श्री डूंबरे, तालुका वैदयकीय अधिकारी श्री संजीव नैतामे यांची उपस्थिती होती.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री रमेश डोंगरे म्हणाले, व्यसनमुक्त समाज ही काळाची गरज आहे. त्याकरिता लोकांनी स्वत: व्यसनापासून दूर राहावे. जेणेकरून मोठमोठया बिमारीपासून आपल्या शरीराला कुटूंबांना वाचविता येईल. आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करता येईल.व्यसनमुक्त समाजासोबतच हागणदारीमुक्त कुटुंब ही आवश्यक आहे. याकरिता स्वच्छतेला प्राधान्य दयायला पाहिजे.प्रत्येकाच्या अंगात स्वच्छता भिनली पाहिजे. आपला घर, परिसर व गाव स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. घर, परिसर व गावात स्वच्छता निर्माण झाली तर रोगराईपासून आपली सुटका होईल. आपल्या कुटुंंबाला चांगले जीवन जगता येईल, असे सांगितले.प्रत्येक गाव हागणदारीमुक्त झालेला आहे. कुटूंबांनी शौचालयाचे बांधकाम करून त्याचा वापर सुरू केलेला आहे. परंतु अशंत: काही ठिकाणी उघडयावर शौचालयाला जाण्याचे प्रमाण आहे. सदर चित्र बदलविण्यासाठी प्रत्येक कुटूंबांनी शौचालयाचा वापर करून आपल्या गावातून रोगराईला आळा घाला असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले.सोनी येथे आयोजित आरोग्य शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, गाव स्वच्छ आणि पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे. याकरिता लोकसहभाग महत्वाचे आहे. हागणदारीमुक्त गावातील प्रत्येकांनी शौचालयाचा वापर करणे गरजेचे आहे. शौचालयाच्या वापरामुळे आपल्या कुटूंबांची सुरक्षा ठेवता येणार आहे. स्वच्छतेमुळेच आपल्या कुटूंबांला निरोगी आयूष्य जगता येणार आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी प्रत्येकांनी प्राधान्य दयायला हवा.सोबतच पर्यावरणाचे रक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजाला व्यसनाधिनतेपासून दूर न्यायचे असे तर गावात दारूबंदी आवश्यक आहे. त्याकरिता महिलांनी पुढाकार घ्यावा. गावात ग्रामरक्षा दल स्थापन करून गावाची सुरक्षा करावी असे सांगितले.आठशे रूग्णांवर झाले विविध उपचारजिल्हा परिषदेचे अध्यक्ष डोंगरे यांचे पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील भव्य आरोग्य शिबिरात सुमारे आठशे रूग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये सोनी, इंदूरा, चपराळ व अन्य गावातील रूग्णांचा समावेश आहे. अस्थिरोग तज्ञ डॉ. निखील डोकरीमारे, स्त्रिरोग तज्ञ डॉ. अनुजा बागडे, बालरोग तज्ञ डॉ.जया थोटे, दंतरोग चिकित्सक डॉ. मुंडले, नेत्र चिकित्सक श्री डूंबरे, तालुका वैदयकीय अधिकारी श्री संजीव नैतामे, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. मेश्राम, डॉ. वानखेडे, व अन्य वैदयकीय अधिकारी, सर्व आरोग्य सेवक, सेविका यांच्या चमूने बिपी, शुगर, एचआयव्ही, मुखरोग, गरोदर मातांची तपासणी, दंत चिकित्सा, नेत्ररोग तपासणी, अस्थीरोग तपासणी व लहान बालकांची तपासणी करून सुमारे आठशे रूग्णांवर उपचार करण्यात आले. ग्रामस्तरावर आरोग्य सेवेला बळकट करण्यासाठी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वैदयकीय चमूने सहकार्य केले.