शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

रोवणीसाठी पेंच व बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:26 IST

पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे ठप्प झाली आहे. शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पेंच व बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी तुमरसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देधान उत्पादक चिंतातूर : पावसाने दडी मारल्याने पीक परिस्थिती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे ठप्प झाली आहे. शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पेंच व बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी तुमरसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.तुमसर व मोहाडी तालुक्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असून निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. शेतकरी बांधवांच्या शेतावर बारमाही सिंचनाची सोय नसल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना सिंचनासाठी बावनथडी व पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर विसंबुन रहावे लागते. निसर्गाची अवकृपा आणि पावसाचा लहरीपणा यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर जलस्त्रात आहेत. त्या जलस्त्रोतातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्ग साथ देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.बळीराजा अजुनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतातील पऱ्हे रोवणीसाठी तयार झाले परंतू बांध्यामध्ये पाण्याचा थेंब नाही. तसेच गाव तलाव व शेततळे अजूनही पावसाअभावी पूर्ण भरले नाहीत. त्यामुळे भात पिकाची रोवणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. शेती करण्यासाठी शेतकरी बांधवांना दरवर्षी कर्ज काढावे लागते.परंतू अस्मानी संकटामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात पाणी व पीक परिस्थिती गंभीर असली तरी संबंधित विभाग सुस्त आहे.कोणतीच उपाययोजना करित नसल्यामुळे धान उत्पादक शेतकरी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी पेंच व बावनथडी प्रकल्प अधिनस्त संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनी वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी आहे.अधिनस्त संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन तसेच समन्वय साधुन तुमसर व मोहाडी तालुक्यातील भात पिकाच्या रोवणीसाठी बावनथडी व पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी राष्टÑवादीचे उपाध्यक्ष राजु कारेमोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.हवामान खात्याचा अंदाज, शेतकरी चिंताग्रस्तपालांदूर (चौ.) : चार महिन्यापैकी दीड महिना कोरडाच गेला. नदी-नाले प्रवाहीत झालेच नसल्याने धरती माता तहानलेलीच आहे. पावसाच्या विश्रांतीने पऱ्हे पिवळी पडत असून झालेली रोवणी सुध्दा धोक्यात आली आहे. हवामान खात्याने पुढचे पाच दिवस पाऊस येणार नसल्याचे भाकित वर्तविल्याने अन्नदाता चिंताग्रस्त झाला आहे. पावसाचा मुख्य नक्षत्रातील मृग व आद्रा अपेक्षित न बरसल्याने कोरडा दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसत आहे. १९६२, १९७२, १९८७ वर्षाला दुष्काळ पडल्याची घटना आज आठवीत असून जाणकारांना धोका वाटत आहे. संपूर्ण जिल्ह्यात तलाव, जलसाठे कोरडे पडले आहेत. विहिरी, बोअरवेल संकटात सापडल्याने सिंचन क्षेत्रातील रोवणी सुध्दा सुकत आहेत. वीज सुरळीत मिळत नसल्याने सिचित क्षेत्र सुध्दा दुष्काळात येत आहे. चुलबंद खोऱ्यात १० टक्के रोवण्ी आटोपत आली आहे. कोरडवाहूच्या नर्सरी पिवळ्या पडत असून रोगराईच्या आधीन होत आहे. वरुण राजा बरसत नसल्याने उष्णता वाढली आहे. याचा परिणाम नक्कीच नकारात्मक रितीने हंगामावर अपेक्षीत आहे. ‘पाणी’ हे जीवन आहे. त्याची प्रचिती सर्वांना जाणवत आहे.जूनच्या शेवटच्या आठवड्यात ३ ते ४ दिवसाच्या पावसाच्या हजेरीने अन्नदात्याने पेरणीस घाई केली. याचा नकारात्मक परिणाम उगवणीवर झाला असून बऱ्याच नर्सरी धोक्यात आल्या. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. पुढील पाच ते सहा दिवस पावसाची विश्रांती चिंतेची वाटते. शेतकºयांनी पिकविमा उतरविणे आवश्यक आहे. कोरडवाहू शेतीचे पऱ्हे संकटकालीन वेळी स्प्रेपंपाने पाणी फवारुन नर्सरी वाचवावी, असे तालुका कृषी अधिकारी लाखनी पद्माकर गिदमारे यांनी सांगितले.नेरला उपसा सिंचनातून लाखनी तालुक्याला पालांदूर परिसरात मागील वर्षी पाणी पुरविण्यात आले होते. त्याचप्रमाणे यावर्षीही पाणी नर्सरी जगविण्याकरिता पुरविण्यात यावे अशी मागणी मचरणाच्या सरपंच संगीता घोनमोडे यांनी केली आहे.