शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बघेडा व कारली जलाशयाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:16 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात अनेक दिवसांपासून वरूणराजाने दडी मारल्यामुळे धान नर्सरी (खारी) करपण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. धान नर्सरी वाचवण्यासाठी बघेडा व कारली जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । धान नर्सरी करपण्याच्या मार्गावर, शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : यावर्षीच्या खरीप हंगामात अनेक दिवसांपासून वरूणराजाने दडी मारल्यामुळे धान नर्सरी (खारी) करपण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. धान नर्सरी वाचवण्यासाठी बघेडा व कारली जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.तुमसर तालुक्यातील बघेडा व कारली जलाशयांतर्गत शेकडो हेक्टरमध्ये धान रोवणी करिता शेतकऱ्यांनी महागडी धानबीजाई विकत आणून धान नर्सरी तयार केली. परंतु वरूणराजाने अनेक दिवसांपासून पाठ फिरवल्याने शेतकºयांच्या धान नर्सरी करपण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. परीसरातील शेतजमीन निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. बोटावर मोजेल एवढेच शेतकरी कृषीपंप धारक आहेत. परंतु विहीरीत पाणी नाही तर तेही शेतकरी पाणी आणणार कुठून, असा प्रश्न आहे. पावसाळ्याचा सव्वा महिला लोटला तरी विहिरीची पातळी वाढली नाही. नाले ओस पडले आहेत. अनेकांची तूर, भाजीपालाव इतर पीक संकटात सापडले आहेत. कर्जबाजारी शेतकºयांचा अवाढव्य खर्च झालेला असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.दुबार पेरणीचे संकटपवनारा येथील शेतकºयांची धान नर्सरी पुर्णत: करपलेली दिसत आहे. बघेडा जलाशयात जवळपास २.२५ मिटर, तर कारली जलाशयात १.५० मिटर पाणी आहे. त्यामुळे बघेडा, पवनारा, कारली, आसलपाणी येथील शेतकºयांच्या धान नर्सरीला जीवनदान मिळू शकते. संबधित विभागाने तातडीने बघेडा व कारली जलाशयाचे पाणी पिकांसाठी सोडण्यास मरणासन्न अवस्थेत असलेल्या पिकांना जीवदान मिळू शकते.केवीलवाणा प्रयत्नपावसाने दडी मारल्याने पीक करपण्याच्या मार्गावर आहे. डोळ्यासमोर कर्जबाजारी होत असल्याचे दिसत असल्याने अनेक शेतकरी पीक वाचविण्यासाठी वाट्टेल ती उपाययोजना करून केविलवणा प्रयत्न करीत आहेत. धान नर्सरीला दूरवरुन बैलगाडीने तसेच बादल्यांमध्ये पाणी आणून पाणी दिले जात आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती