लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली. योजनेंतर्गत महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर जिल्ह्यात दमदार प्रतिसाद मिळाला. सरकारही स्थापन झाले. त्यानंतर शासनाने पात्रतेचे नवे निकष लागू केले. दरम्यान बोगस लाभार्थ्यांनी पैसा लाटल्याचा आरोप झाल्यानंतर शासनाने अशा महिलांचा शोध सुरू केला आहे. यादरम्यान जिल्ह्यातील काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभसोडून दिला. दरम्यान या योजनेची नोंदणीही बंद झाली आहे. आता नोंदणी बंद होऊन नऊ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे.
....तर लाडक्या बहिणींचे होऊ शकतात अर्ज बाद
- कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक किंवा कुटुंबात आयकरदाता सदस्य असेल, तसेच सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल तर अर्ज बाद होईल. इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या १५०० पेक्षा जास्त रकमेचा लाभघेतल्याचे आढळल्यास.
- कुटुंबातील सदस्य भारत सरकार सरकारच्या उपक्रमांपैकी एखाद्या उपक्रमात संचालक अथवा सदस्य असेल, कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तरीही त्या महिलेचा अर्ज बाद ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) असेल तर अर्ज प्रशासनाकडून रद्द केला जाईल.
आयकर भरणाऱ्या महिलांना वगळणार...जिल्ह्यातील २,८२,७८८ महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला. 'डीबीटी'द्वारे थेट बँक खात्यात हे अनुदान जमा करण्यात आले; परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता मात्र मिळालेला नाही. ज्या महिलांच्या कुटुंबात कार असेल, अशा महिलांची नावे योजनेतून वगळली जाणार असल्याने लाभार्थी महिलांची संख्या घटणार आहे. 'आयटीआर' भरणाऱ्यांनीही फॉर्म भरलेले होते.
१७ हजार महिलांचे अर्ज रद्दजिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार १८३ महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत. 'लाडकी बहीण'चा लाभ देण्यात येत नाही. येत्या काळात लाभ सोडणाऱ्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
आधार लिंकवरून लाभाची पडताळणी होणार'लाडकी बहीण' योजनेचा लाभघेण्यासाठी संबंधित महिलेचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे. तेव्हाच अनुदानाची रक्कम मिळते. माध्यमातून जिल्ह्यातील 'नमो शेतकरी सन्मान योजने'त सहभागी महिलांचा शोध घेतला जातो आहे. या माध्यमातून लाभ मिळणाऱ्या महिलांचा शोध घेणे सुरू आहे.
२.८२ लाख लाभार्थी जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे आहेत.सध्या १५०० रुपयांचा लाभमिळतो आहे. मात्र, आगामी काळात लाभ घेणाऱ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
"राज्य शासनाच्या आदेशानुसार आता नवीन लाडक्या बहिणींची नोंदणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केले जात नाही. ज्यांना इतर योजनांमधून पैसे मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेतून ते वजा केले जातील, अशी सूचना आली आहे. त्यामुळे त्यासंदर्भात इतर आदेश येण्याची गरज नाही. अशा लाडक्या बहिणींचे अनुदान नाकारले जाणार आहे."- अरुण बांदूरकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, भंडारा.