लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत सहा महिन्यापासून देव्हाडी परिसरात मध विक्री करणाऱ्यांचे बिऱ्हाड थाटले आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांचेवर उपासमारीचे संकट आहे. मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅकजवळ त्यांनी सहा कापडी झोपड्या तयार केल्या. त्यात त्यांचे वास्तव्य आहे. दुपारी जवळील झाडाच्या सावलीत दिवस घालवितात. रात्री कापडी झोपडीत घालवितात. रेल्वे वाहतूक सुरू नसल्याने ते मुळ बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यात परतू शकले नाही.कोरोना विषाणूचा फटका सर्वसामान्य व गरीबांना अधिक बसला आहे. लोकांना गोड मध विक्री करून उदरनिर्वाह करणारे सुमारे ३५ जणांचे बिºहाड देव्हाडी येथे रेल्वे ट्रॅकजवळ झोपड्यात वास्तव्याला आहे. यात आठ महियांच्या चिमुकले ते ५ वर्षापर्यंत लहान मुलांचा समावेश आहे. मागील सहा महिन्यापुर्वी ते देव्हाडी येथे आले होते. मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅकशेजारीच त्यांनी प्लॉस्टिक युक्त कापडाच्या सहा झोपड्या तयार केल्या. शेतशिवारात फिरून ते मध गोळा करतात. नंतर ते मध गावात व शहरात विक्री करतात. मध गोळा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. पुरूषांना महिला या कामात मदत करतात. अचानक आलेल्या कोरोना संकटात सर्व व्यवहार बंद होईल याची त्यांना माहिती नव्हती, अशी माहिती त्यांनी सांगितली. या कुटुंबांकडे तालुका प्रशासनाने लक्ष देऊन त्यांना धान्य पुरवठा करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.लहान मुले-महिलांचा समावेश३५ जणांचा त्यात समावेश असून चार कुटुंबांचा त्यात समावेश आहे. यात ८ महिन्याच्या बाळाचा ते ५ वर्षीय मुली-मुलांचा समावेश आहे. रणरणत्या उन्हाचा त्रास होतो म्हणून सकाळी १० ते दुपारी ४पर्यंंत सर्व कुटुंबाचे जवळच्या झाडाखाली ते आसरा घेतात.गावाला परत जाणारचारही कुटुंब बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. गरीबामुळे त्यांना स्थलांतरीत जीवन जगावे लागत आहे. महिन्यापुर्वी देव्हाडी येथे ते आले. लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा आपल्या गावाकडे जाणार असल्याचे येथील राजेश महतो यांनी लोकमतला सांगितले.अन्नधान्याचा पुरवठालॉकडाऊनमध्ये तुमसर तहसील कार्यालयाकडून ६० किलोग्रॅम अन्नधान्य या कुटुंबाला सहा ते सात दिवसापुर्वी देण्यात आला. सध्या त्यांचेजवळील अन्नधान्य संपले आहे. पुन्हा त्यांना अन्नधान्यांची पुरवठा करून तात्पुरती निवासी व्यवस्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्याची गरज आहे.मध विक्री करणाऱ्याकुटुंबांना सहा दिवसापुर्वी अन्नधान्यांचा पुरवठा करण्यात आला होता. पुन्हा त्यांना तात्काळ धान्याचा पुरवठा क रण्यात येईल. अन्य अडचणी सुद्धा दूर करू.-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसरलॉकडाऊनमुळे मध गोळा करणाऱ्या चार कुटुंबासमोर संकट उभे आहे. येथील चिमुकल्यांना सुरक्षित जागी हलविणे गरजेचे आहे. अवकाळी पावसात त्यांना ओलेचिंब व्हावे लागते. उन्हाचा तडाखा बसत आहे.-देवसिंग सव्वालाखे,जिल्हा परिषद माजी सदस्य देव्हाडी
मध विक्री करणारे परप्रांतीय उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST
कोरोना विषाणूचा फटका सर्वसामान्य व गरीबांना अधिक बसला आहे. लोकांना गोड मध विक्री करून उदरनिर्वाह करणारे सुमारे ३५ जणांचे बिºहाड देव्हाडी येथे रेल्वे ट्रॅकजवळ झोपड्यात वास्तव्याला आहे. यात आठ महियांच्या चिमुकले ते ५ वर्षापर्यंत लहान मुलांचा समावेश आहे. मागील सहा महिन्यापुर्वी ते देव्हाडी येथे आले होते. मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅकशेजारीच त्यांनी प्लॉस्टिक युक्त कापडाच्या सहा झोपड्या तयार केल्या.
मध विक्री करणारे परप्रांतीय उघड्यावर
ठळक मुद्देझोपड्यात वास्तव्य : जीवनावश्यक वस्तूंचे वितरण गरजेचे