चुलबंद खोऱ्यातील लाल सोना कोरोनाच्या सावटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:36 AM2021-05-18T04:36:49+5:302021-05-18T04:36:49+5:30

पालांदूर : चुलबंद खोऱ्यातील बोट लाल मिरची दैनंदिन आहारात खवय्ये चवीने वापरतात. दरवर्षी मागणी वाढत असल्याने लागवडीत सुमार वाढ ...

Red gold corona in Chulband valley! | चुलबंद खोऱ्यातील लाल सोना कोरोनाच्या सावटात!

चुलबंद खोऱ्यातील लाल सोना कोरोनाच्या सावटात!

Next

पालांदूर : चुलबंद खोऱ्यातील बोट लाल मिरची दैनंदिन आहारात खवय्ये चवीने वापरतात. दरवर्षी मागणी वाढत असल्याने लागवडीत सुमार वाढ झालेली आहे. अनेक शेतकरी हिरवी मिरची न तोडता तिला लाल करूनच विकतात. २६० रुपये प्रति किलोच्या घरात विकणारी लाल मिरची कोरोनाच्या संकटाने २०० रुपयाच्या आत आलेली आहे. ग्राहक नसल्याने घरूनच विकणारी मिरची विकत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

चुलबंद खोरे भंडारा जिल्ह्याचे कॅलिफोर्निया ठरले आहे. सदाबहार शेतीमुळे जनजीवन सदाबहार असते. परंतु गतवर्षीपासून लाॅकडाऊनच्या समस्येने शेती धोक्यात आली आहे. गतवर्षी कोरोनाने शेतकऱ्यांची उलाढाल थांबली होती. चालू वर्षात तीच परिस्थिती पुन्हा उभी राहिल्याने शेतमालाचे भाव अनपेक्षित गडगडलेले आहेत.

भाजीपाल्यातील प्रत्येक भाज्यांचे दर मातीमोल ठरले आहेत. लागवड, विक्री, वाहतूक, काढणी आदींचे खर्च लक्षात घेता, वर्तमानातील दर न परवडणारे आहेत. मार्च महिन्यात निघालेली लाल मिरची एप्रिल महिन्यापासून चांगल्या दराने विकली जाते. लाल मिरचीच्या उत्पादनात दरवर्षी भरीव वाढ होते. वाढीनुसार ग्राहकसुद्धा वाढलेला आहे. मात्र जीवघेण्या संकटाने लाॅकडाऊन उभे झाल्याने लाल मिरचीला ग्राहकच कमी होत आहेत. संकरित लाल मिरची अर्ध्या भावात विकते, तर लाल केलेली बोट मिरची तिच्या दुप्पट भावात विकली जाते.

मसाला पदार्थांमध्ये तिखटाची भूमिका बोट असलेली लाल मिरची उत्तम रितीने भागवीत आहे. खूप तिखट न लागता मानवी शरीराला अपेक्षित असलेले तिखट बोट मिरची अपेक्षितपणे भागवीत आहे. भाजीला चव या मिरचीने चांगली येते. सावजी भोजनालयाच्या पॅटर्नमध्ये बोट लाल मिरचीला अधिक पसंती दिली जाते. घरगुती खवय्ये वर्षभर पुरेल या बेताने एकदाच थेट वर्षभरासाठी खरेदी करतात. बोट मिरचीच्या विक्रीचा काळ व लाॅकडाऊनचा काळ एकच आल्याने विक्रीला प्रतिबंध आला आहे.

एप्रिलपासून कोरोनाने जनसामान्य भयभीत झाले. त्यामुळे ग्राहक शेतकऱ्यांकडे अर्थात मिरची उत्पादकाकडे फिरकले नाही. त्यामुळे बोट लाल मिरची अर्थात लाल सोने शेतकऱ्यांकडे आजही पडून आहे.

लाल मिरची उत्पादनात कमी असते. परंतु जमीन सुपीक असल्याने उत्पादन बरे आहे. भाव चांगला मिळत असल्याने लागवड दरवर्षी वाढत आहे. याकरिता कृषी विभागाचेसुद्धा नव्या तंत्रज्ञानाने मार्गदर्शन मिळत आहे.

कोट

यावर्षी उत्पादन बरे झाले; परंतु लाॅकडाऊन लागल्याने मागणी घटलेली आहे. पर्यायाने भावसुद्धा गडगडलेले आहेत. खर्चाच्या तुलनेत भाव परवडणारा नाही.

श्रावण सपाटे (शेंडे) मिरची उत्पादक शेतकरी पाथरी येथील महिलांसह पुरुष शेतकरी प्रगतशील असून, नव्या तंत्राचा वापर करणारा आहे. सर्वच पीक या भागात उत्पादित होतात. परंतु बाजार पेठेतील भाव खर्चाच्या तुलनेत मिळत नसल्याच्या तक्रारीने शेतकरी नाराज आहे.

गणपती पांडेगावकर, मंडल कृषी अधिकारी, पालांदूर.

Web Title: Red gold corona in Chulband valley!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.