देवानंद नंदेश्वर - भंडाराजिल्ह्यातील केबल आॅपरेटर, डीटीएच व इतर करमणुकीच्या माध्यमातून एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ९० लाख १३ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला आहे. भंडारा जिल्ह्याला २०१४-१५ या आर्थिक वर्षात १.२५ कोटी रूपयांचा करमणूक कर गोळा करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यात एकूण १९ हजार ३०४ केबल ग्राहक आहेत. केबल ग्राहकांकडून नऊ महिन्यांत ३३ लाख ४८ हजार रूपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. केबलच्या तुलनेत डीटीएच लावल्याने टीव्ही चांगली दिसते. त्याचबरोबर संपूर्ण चॅनेल डीटीएचवर बघायला मिळतात. त्याचबरोबर केबल तुटल्याचीही तक्र ार राहत नाही. त्यामुळे ग्राहक डीटीएचकडे वळत चालला आहे. भंडारा जिल्ह्यात डीटीएचच्या माध्यमातून ४४ लाख २३ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला आहे. डीटीएच रिचार्ज मोबाईलच्या माध्यमातून मारले जातात. त्यामुळे याबाबतची नोंद मुंबई येथील कार्यालयात होते. त्याची एक प्रत जिल्हा कार्यालयाला पाठविले जातात. जिल्ह्यात व्हिडीयो केंद्र नाही. भंडारा जिल्ह्यात चार चित्रपटगृह आहेत. यात भंडारा येथे १, पवनीत २ तर साकोलीत एक चित्रपटगृहाचा समावेश आहे. यावर्षात चित्रपटगृहाच्या माध्यमातून १० लाख ८७ हजार रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. जिल्ह्यात नऊ व्हिडीयो गेम पार्लर आहेत. यात भंडारा येथे २, मोहाडी येथे २, तर तुमसर येथे ५ व्हिडीयो गेम पार्लरचा समावेश आहे. व्हिडीयो गेम पार्लरच्या माध्यमातून १.५५ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्यात आले आहे.भंडारा जिल्ह्यात विविध माध्यमातून एकूण नऊ महिन्यांत ९० लाख १३ हजार रूपयांचा महसूल करमणूक विभागाने गोळा केला आहे. डिसेंबर अखेरपर्यत ७२ टक्के वसूली गोळा करण्यात आली. मार्चपर्यत आयुक्तांकडून मिळालेले उद्दिष्ट पुर्ण होईल, यात शंका नाही.डीटीएच खरेदीकडे वाढला कल डीटीएचमुळे क्वालिटी चांगली दिसण्याबरोबरच संपूर्ण चॅनलही बघायला मिळतात. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांचा डीटीएच खरेदी करण्याकडे विशेष कल दिसून येतो. त्यामुळे मागील काही दिवसांपासून केबलची संख्या झपाट्याने घटली आहे. डीटीएचमुळे क्वालिटी चांगली दिसण्याबरोबरच संपूर्ण चॅनलही बघायला मिळतात. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांचा डीटीएच खरेदी करण्याकडे विशेष कल दिसून येतो.
९० लाखांचा करमणूक कर वसूल
By admin | Updated: January 7, 2015 22:47 IST