शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या ५० नवीन वसतिगृहांना मान्यता

By admin | Updated: February 3, 2016 00:32 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या सुवर्ण महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्यात मुलींच्या नवीन ५० शासकीय वसतिगृहांना मान्यता दिली आहे.

इंद्रपाल कटकवार भंडाराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या सुवर्ण महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्यात मुलींच्या नवीन ५० शासकीय वसतिगृहांना मान्यता दिली आहे. यामध्ये २५० विद्यार्थी क्षमता असलेले सात विभागीय स्तरावरील तर १०० विद्यार्थी क्षमता असलेले २२ वसतिगृह तालुका स्तरावरील राहणार आहेत. भंडारा जिल्ह्याच्या वाट्यााला दोन वसतिगृहे आली आहेत. विदर्भात २१ वसतिगृहांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये विभागीय स्तरावरील १ तर, तालुका स्तरावर २० वसतिगृहे विदर्भात देण्यात आली आहेत. उत्तरोत्तर होणाऱ्या शिक्षणाचा प्रसार व शिक्षणाबद्दल होणारी जागृती विचारात घेता मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागासवर्गीय मुला/मुलींसाठी जिल्हा व तालुका स्तरावर राहण्याची सोय नसल्यामुळे व शिक्षणाचा पुढील खर्च परवडणारा नसल्यामुळे शिक्षणापासून ते वंचित राहू नयेत, तसेच त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. सध्या राज्यात कार्यरत असलेल्या ३८१ शासकीय वसतिगृहांपैकी मुलींसाठी १६१ वसतिगृहे कार्यरत आहेत. मुलींच्या शिक्षणाचा प्रसार व त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा पाहता ही वसतिगृहे अपुरी पडत असल्याचे शासनाच्या निदशर्नास आले आहे. या सर्व बाबीचा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षात मागासवर्गीय मुलींना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे म्हणून मुलींसाठी विभागीय स्तरावर सात वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावर ४३ अशी एकूण ५० नवीन शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. ही वसतिगृहे येत्या १८ फेब्रुवारीपासून तातडीने सुरू करावेत, असे आदेश शासनाने दिले आहेत.