शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

अखर्चित निधीला मान्यता

By admin | Updated: September 17, 2015 00:29 IST

जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत भंडारा जिल्ह्यात सन २०११-१२ व २०१२-१३ मध्ये प्राप्त झालेल्या....

काशिवारांच्या प्रयत्नांना यश : महसूल मंत्र्यांशी चर्चासाकोली : जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत भंडारा जिल्ह्यात सन २०११-१२ व २०१२-१३ मध्ये प्राप्त झालेल्या निधीतून अनेक नवीन अंगणवाड्या बांधण्यात आल्या. काही अंगणवाड्या प्रस्तावित होत्या. सदर प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता असली तरी हा निधी खर्च करण्यासाठी मान्यता मिळाली नव्हती. अखेर आमदार बाळा काशीवार यांनी हा मुद्दा रेटून धरताच निधी मंजूर केला. तसा शासन निर्णयही मंगळवारी महिला बालकल्याण विभागाने काढला आहे.सन २०११-१२ व २०१२-१३ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद भंडारा यांना जिल्हा वार्षिक योजना (डीपीडीसी) अंतर्गत सन २०११-१२ या आर्थिक वर्षात रुपये ५१३ लाख, सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात ९० लाख व १३ वा वित्त आयोगांतर्गत सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात १९८ लाख रुपये अशाप्रकारे एकूण ८०१ लाख रुपये इतका निधी सन २०११-१२ व २०१२-१३ या वर्षात अंगणवाडी बांधकामासाठी उपलब्ध करुन देण्यात आला होता. तथापी भंडारा जिल्हा परिषदेकडे सदर निधीपैकी जिल्हा नियोजन समिती अंतर्गतचा ६२ लाख ८८ हजार ६८५ रुपये व १३ व्या वित्त आयोगांतर्गत १७१.६६ लाख असा एकूण २ कोटी ३४ लाख ५४ हजार ६५८ रुपये इतका निधी अखर्चित राहिला होता. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वरील सर्व स्त्रोतामधून प्राप्त झालेला निधी व शिल्लक निधीबाबत आढावा घेतला. त्याला शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर अखर्चित निधी एकूण २ कोटी ३४ लाख ५४ हजार ६५८ रुपये सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात दिनांक ३१ मार्च २०१६ पर्यंत खर्च करण्यास काही अटी लावून मान्यता देण्यात आली आहे. यात जी कामे भौतिकदृष्टया पुर्ण झाली आहेत व खर्चाच्या परवानगीअभावी देयकाचे प्रदान होऊ शकत नाही, अशा कामावर निधी खर्च करण्यात यावा. त्या कामावर इतर स्त्रोतातून खर्च न झाल्याची खात्री मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करायची आहे. जी कामे सुरु होऊन भौतिकदृष्ट्या अपूर्ण आहेत, ती कामे ३१ मार्च २०१६ पर्यंत होतील, असे नियोजन करुन सदरनिधी ३१ मार्च २०१६ पर्यंत खर्च करण्यात येईल. याची दक्षता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी घ्यावी आदी अटींचा शासन निर्णयात समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)महसूल मंत्र्यांचे आश्वासन