शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

वन उद्यानात होतेय औषधी रोपांचे संगोपन

By admin | Updated: November 13, 2016 00:27 IST

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अधिकारी कार्यालय देवरीअंतर्गत येणाऱ्या सडक अर्जुनी तालुक्यातील ...

पर्यटकांसाठी आकर्षक : तालुक्यात लावली ७५ हजार रोपे सडक अर्जुनी/देवरी : सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अधिकारी कार्यालय देवरीअंतर्गत येणाऱ्या सडक अर्जुनी तालुक्यातील सडक अर्जुनी, शेंडा, कोहमारा-कोकणा, खजरी-डव्वा, घटेगाव-घोटी, श्रीरामनगर, उशीखेडा-कोयलारी, पुतळी-कोयलारी, मुंडीपार-पांढरी या मार्गावर व मिश्र रोपवनात ७५ हजार झाडे लावून त्याचे संगोपन केले जात आहे. याशिवाय नवाटोला येथील वनउद्यानात औषधी वनस्पतींच्या रोपांचे संगोपन केले जात असल्यामुळे हे उद्यान हौशी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून लावण्यात आलेली झाडे १०० टक्के आजही जिवंत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावल्याने अनेक मार्ग हिरवेगार झाल्याचा आनंद मिळतो. वनीकरणाच्या माध्यमातून अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.सामाजिक वनीकरण कार्यालय गोंदियाअंतर्गत मौजा नवाटोला येथील गट क्रमांक ३१६/४१७ वर पाटील जैवविविधता वन उद्यान तयार करण्यात आले आहे. एकूण २.५० हेक्टर आर क्षेत्रमध्ये हे उद्यान तयार करण्यात आले आहे. या उद्यानात लावण्यात आलेल्या झाडांना नियमित सिंचनाची सोय व्हावी यासाठी दोन लाख लिटर पाण्याचा जलकुंभ तयार करण्यात आला आहेत. स्व.उत्तमराव पाटील जैव विविधता वन उद्यान नवाटोला हे राष्ट्रीय महामार्गाला लागून जुन्या चेक पोस्टजवळ आहे. उद्यानाचे काम गेल्या एक वर्षापासून प्रगतीपथावर आहे. या उद्यानातील वनांची वेगवेगळी १६ नावे देण्यात आली आहेत. या वनात नक्षत्रावर आधारित विविध राशीवर, नव ग्रहावर आधारित वृक्षांची लागवड केली आहे. ह्यात १३५४ रोपांची संख्या आहेत. मानवाच्या दृष्टीस दिसत नाही अशाही नवीन नावांची औषधी रोपे पहावयास मिळतात. वन उद्यानात दिवसभर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील हौसी पर्यटक टिफीन आणून जेवणाचा आनंद घेताना दिसतात. पर्यटकांना विश्रांतीसाठी फारच उपयोगाचे हे औषधीवन उद्यान ठरले आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी सुलभ शौचालय-बाथरुमची सुविधाही केली आहे. (शहर प्रतिनिधी)वनात पहायला मिळतात पारंपरिक ते आधुनिक वृक्षउद्यानाला वनोऔषधी उद्यान असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यात महाभारत, वन-फणस, तेजपान, हिरडा, कदम, चंदन, कन्हेर, बेल, खवट, रूई, आवळा, अशोक, जांभुळ, खिरनी अशा १३ वनोषधीची रोपे लावली आहेत. रावण वन-आंजन, जास्वंद, महा, आवळा, पळस, आंबा, टेटू, खवट, फणस, पिंपळ, अशोक, बेल यांचीही झाडे आहेत. जैन वन-पिंपळ, नाकेशक, बांबू, वळ, बकूळ, आंबा, सप्तपर्णी ही रोपे या वनात आहेत. बुद्धवन- पिंपळ, वळ, बेल, कडूनिंब, पाकड, चंपा आदी रोपे आहेत. अल्टीनेशन गार्डनमध्ये वन-जास्वंद, गिलगिरी, जांभुळ, चंदन हे आहेत. गणेशवन, ख्रिश्चनवन, सप्तश्रृती वन, त्रिफळा वन, फ्रुटवन, शिखवन, अशोक वन, नंदनवन, उस्काम वन, बांबूवन, चिर्ल्ड नपार्क, नक्षत्रवन या वनात औषधीयुक्त विविध २६० जातींची रोपे लावण्यात आली आहेत.