शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सानगडी येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST

रास्ता रोको आंदोलनानंतर शिवमंदिर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, साकोलीचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर शिंदे, डोंगरगाव डीसीचे साहाय्यक अभियंता अजय गेडाम व लेखापाल नंदकिशोर शहारे यांनी आंदोलनात सहभागी सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी प्रत्येक दिवशी चक्राकार पद्धतीने आठ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील सासरा, सानगडी संयुक्त किसान समितीच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात कृषिपंपांना अखंडित १० तास वीजपुरवठा व्हावा व इतर मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बसस्थानकाच्या चौकात  जाहीर सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संयुक्त किसान समितीचे अध्यक्ष किशोर बारस्कर होते. सभेत शैलेश गणवीर, राजू बडोले, राजेश पोवनकर, भाऊराव गोटेफोडे, विनायक नंदरधन, भास्कर ईटवले, हंसराज नगरकर, चंद्रशेखर गायधने, गोपाल पोवनकर, प्रकाश गोटेफोडे, अरुण गोटेफोडे यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर बसस्टँड चौकात प्रतीकात्मक रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. रास्ता रोको आंदोलनानंतर शिवमंदिर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, साकोलीचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर शिंदे, डोंगरगाव डीसीचे साहाय्यक अभियंता अजय गेडाम व लेखापाल नंदकिशोर शहारे यांनी आंदोलनात सहभागी सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी प्रत्येक दिवशी चक्राकार पद्धतीने आठ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात येईल. काही कारणांमुळे वीज खंडित झाल्यास तेवढी वेळ वाढवून देण्यात येईल. सभेचे संचालन व झालेल्या सामूहिक चर्चेनंतर जगदीश ईटवले यांनी आभार प्रदर्शन केले. १५ दिवसांत सर्व मागण्यांची व्यवस्थित पूर्तता झाली नाही तर साकोली येथील विद्युत कंपनीच्या विभागीय कार्यालयावर सानगडी ते साकोली असा पायी मार्च काढून बेमुदत उपोषण आंदोलन  आंदोलन करण्यात येईल, याला जवाबदार शासन राहील, असा इशारा शिवकुमार गणवीर यांनी दिला.

अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे- थकीत वीज बिलामध्ये शासनाने दिलेल्या सवलतीचा फायदा शेतकऱ्याने घेऊन त्यांची  खंडित केलेली वीज जोडून देण्यात येईल.  मीटर जळण्याच्या कारणांची माहिती घेऊन नैसर्गिकरीत्या जळलेले मीटर विनामूल्य लावून देण्यात येतील. यापुढे रीडिंगप्रमाणे बिल देण्यात येतील व आतापर्यंत दिलेल्या सरासरी बिलामध्ये दुरुस्ती करून देण्यात येईल. डीपीच्या  व लाईनच्या देखभालीचे काम निर्धारित वेळेवरच करण्यात येतील व शासनाच्या नवीन योजनेप्रमाणे शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्याला नवीन वीज कनेक्शन देण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. आता आश्वासनाची पूर्ततेकडे सानगडी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप