शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

अवकाळी पावसाने रबी पिकाला फटका

By admin | Updated: March 2, 2015 00:44 IST

रविवारी दुपारनंतर अवकाळी मुसळधार पावसामुळे आंबा मोहराला फटका बसला. यामुळे कापणीला आलेले व कापणी झालेले रबी पीक पूर्णत: धोक्यात आले आहे.

भंडारा : रविवारी दुपारनंतर अवकाळी मुसळधार पावसामुळे आंबा मोहराला फटका बसला. यामुळे कापणीला आलेले व कापणी झालेले रबी पीक पूर्णत: धोक्यात आले आहे. पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला शेकडो क्विंटल शेतमाल भिजला. तो उचलण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी खरीप हंगामात पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. आवश्यकता असताना पावसाने दडी मारली होती. यामुळे खरीप पिके धोक्यात आल्याने धानपीके करपली होती. त्यामुळे शेकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. यातून शेतकऱ्यांनी स्वत:ला सावरत रबी पिकांच्या माध्यमातून कर्जाचा बोझा कमी करण्याच्या तयारीत होते. शेतकरी अशा अपेक्षेत असतानाच शनिवारपासून ढगाळ वातावरण आहे. रात्री काही प्रमाणात तुरळक पाऊस पडला. रविवारी दुपारनंतर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातील कापणीला आलेला व डौलात उभा असलेला गहू पूर्णत: जमीनीवर लोळला. शनिवारीपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळनंतर तुरळक पावसाने सुरूवात केली. मध्यरात्री जिल्ह्यात पाऊस बरसला. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून दुपारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सायंकाळी ४ वाजातच्या सुमारास जोरदार पावसाने सुरूवात केली. हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र पडला. अवकाळी पावसामुळे धान पिकांना वगळून रब्बीचे चना, गहू, तूर, वटाणा, निंबू, कांदा, लाखोळी, टरबूज व कळधान्यासह भाजीपाल्यालाही जबर फटका बसला. काही ठिकाणी गहू भूईसपाट झाल्याचे चित्र आहे. सुमारे तासभर बरसलेल्या पावसामुळे उभ्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. कापणी झालेल्या हरभरा व तुरीच्या शेतात लावलेल्या गंजा अवकाळी पावसाने भिजल्या. आधिच जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास पळविला.याशिवाय बहरलेल्या आंब्याचा मोहर गळून पडला आहे. यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या आंब्याच्या उत्पादनावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अकाली पावसामुळे वातावरणात बदल झाला असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. वृत्त लिहिपर्यंत पाऊस सुरू होता. (शहर प्रतिनिधी)