शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

भंडारा येथे रापमचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:32 IST

राज्य परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन भंडारा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. भंडारा बसस्थानकात झालेल्या समारंभात बसस्थानकाचा परिसर रांगोळी तथा तोरणांनी सजवून आकर्षक बनविण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढवून दिली.

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती : प्रवाशांचे स्वागत, रांगोळी व तोरणांनी सजविला परिसर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन भंडारा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. भंडारा बसस्थानकात झालेल्या समारंभात बसस्थानकाचा परिसर रांगोळी तथा तोरणांनी सजवून आकर्षक बनविण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढवून दिली.१ जून हा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वर्धापण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात भंडारा विभागाचे विभागप्रमुख विनोदकुमार भालेराव, यंत्र अभियंता (चालन) गजानन नागुलवार, विभागीय लेखा अधिकारी सुरेंद्र वाघधरे, सुरक्षा व दक्षता अधिकारी लोणे, कामगार अधिकारी भारती कोसरे, आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे, बसस्थानक प्रमुख सारीका पु. लिमजे, वाहतुक निरिक्षक सुनिल जिभकाटे यांच्यासह विभागीय कार्यालयातील अधिकारी व भंडारा आगारातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जेष्ठ वृध्द महिला व ज्येष्ठ पुरुष प्रवाशी यांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे परिवहनदिनाचे औचित्य साधून एक जून पासून शिवशाहीबसमध्ये ४५ टक्के व शिवशाही स्लिपर बसमध्ये ३० टक्के प्रवास भाड्यात सवलतीची सुरुवात करण्यात आली. उपस्थितांचे आभार आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता रापनिचे अधिकारी तथा कर्मचाºयांनी सहकार्य केले.