शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

भंडाराकरांना ‘मधुसुदनाय’ संगीतनाट्याने रिझविले

By admin | Updated: April 4, 2017 00:32 IST

कोट्यवधी हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीकृष्ण यांच्या जीवन कार्यावर आधारित मधुसुदनाय या संगीत नाट्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

नृत्य नाटिका : श्रीराम शोभायात्रा समिती व महर्षी विद्या मंदिराचा उपक्रमभंडारा : कोट्यवधी हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीकृष्ण यांच्या जीवन कार्यावर आधारित मधुसुदनाय या संगीत नाट्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. औचित्य होते श्रीराम नवमी उत्सव पर्वाचे. प्रभू श्रीराम शोभायात्रा समिती तथा महर्षी विद्या मंदिर शाळेच्या संयुक्त विद्यमाने खात रोड मार्गावरील रेल्वे मैदानात रविवारी रात्री ७ वाजता सदर नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धनंजय दलाल, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, प्राचार्या श्रृती ओहळे, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष संजय कुंभलकर, सतीश सार्वे, बाळ आंबेकर यांच्यासह अन्य अतिथी उपस्थित होते. परंपरेनुसार गुरु तथा प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेच्या पूजनाने या महानाट्याला सुरुवात करण्यात आली. महानाट्याचे लेखक अ‍ॅड.गौरव खोंड, दिग्दर्शक सतीश बगळे, प्राचार्य ओहळे, जयश्री जोशी, अलासपुरे, संगीतराव व अन्य शिक्षकवृंदांच्या सहकार्याने महानाट्य नाटीका सादर करण्यात आली. या नाटीकेत कृष्णजन्म, कृष्णलिला, कृष्णाचा पाळणा, कृष्णाचे विराट स्वरुप, कालिया मर्दन, महारासलिला, सुदामा भेट, राधाक्रिष्ण प्रेम प्रसंग वर्णन, गरबा होळी, दहीहंडी यापेक्षा एक सरस देखावे तथा सादरीकरण महर्षी विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रस्तूत केली तथा उपस्थितांची दाद मिळविली. या महानाटिकेत शाळेच्या जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता हे येथे उल्लेखनीय.प्रास्ताविक प्राचार्य श्रृती ओहळे यांनी तर आभार संजय कुंभलकर यांनी मानले. पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी भाग्यश्री ब्राम्हणकर, संध्या भोवते, अनिता वाघमारे, विनोद पत्थे, हुकरे, रोकडे, प्रज्ञा संगीतवार, कावळे, विभावरी मिश्रा, गंगणे, पाटणे, रंगारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यासह श्रीराम शोभायात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)